कोण म्हणतं प्रेम करायला..
एक प्रेयशीच पाहीजे...
तिच्या आठवनीत सुद्धा जगता येत..
कधी कधी पाहीजे तसे...
तु फ़ुला सारखी फ़ुललीस...
की मला भ्रमर व्हावेसे वाटते..
तु मोहरत असताना...
तुझ्या भोवती भिरभिरावेसे वाटते..
तुझ्या आयुश्यात फ़ुले पेरता पेरता..
सारे काटे आले माझ्या पदरात ...
दोन क्षणाचे नाते आपले...
मग ओढ हि अशी दिनरात..
शब्दांच्या खेळात या..
नेहमी तुच जिंकावं...
मी मात्र हरुन सुद्धा...
तुझ्या साठी हसावं..
मोहात मि नव्हतो कधीच..
पण तुझी काळजी होती...
तुझ्या सहवासाची येण्याची...
सवय मज जडली होती
कुणीतरी म्हटले मला..
नाव बदल तुझं...
कस समजाऊ मी त्यांना..
त्यातचं तर जपतोय अस्तित्व मी तुझं
होशिल का गं तू माझी..
हे माझे काही उद्गार...
ते कानावर पडताच तुझ्या..
तु केलेला तो हाहाकार..
मी भिजू नये म्हणून..
तु माझ्या डोक्यावर धरलेला हात...
त्या पावसा सोबत वाहत होती..
ओसंडुन आपल्या प्रेमाची लाट...
No comments:
Post a Comment