Wednesday, November 9, 2011

जाणता अजाणता चुका चिक्कार झाल्या

जाणता अजाणता चुका चिक्कार झाल्या
घातल्या तुला हाका,आज चीत्त्कार झाल्या

शोधतो इथे तिथे त्या पाऊलखुणा न सापडे
तुझी वाट दावनार्या,वाटाही पसार झाल्या

वारा तो अश्व जाहला..न थांबतो,न सांगतो
भुंगा हि न जाने,म्हणे इथे कळ्या फार झाल्या

शोधण्या तुला मी चंद्रास नजर ठेवण्या सांगतो
भग्न पावलेल्या दिशा,त्याही तयार झाल्या

ये निघून सखे आता जीव हि विझण्यात आहे
आठवणी पहा त्या आसवांच्याही पार झाल्या

No comments:

Post a Comment