ठावूक आहे का सये आयुष्याच्या
वाळवंटात स्वप्नांचे झरे आहेत
सावली म्हणून जरी सोबतीस माझ्या
पण प्रतिबिंब विश्वासाचे खरे आहे
लाटेला त्या मिठीत घेताना सये
सागराला दुराव्याची नसते भीती
प्रत्येक क्षण स्पर्श अनुभूतीचा जरी
अल्प त्या क्षणात त्याने जगावे तरी किती ?
एक क्षण प्रेमाचा त्या लाटांना लाभला
पूर्ण अस्तित्व त्यांचा इथेच संपला
प्रेम करावे असे सख्या जिथे नाही कशाची भीती
प्रेमच असतो प्रेम साठी शेवटी ..............
शेवटी तुला माझे डोळे समजलेच नाही
मी पापण्यांची झालर केली तुला उमगलेच नाही
डोकावलस ना तू त्या दिवशी ...
No comments:
Post a Comment