Thursday, November 10, 2011

परतीची तुझ्या वेडीच आशा सये

परतीची तुझ्या वेडीच आशा सये
या वेड्या माझ्या मनाला
तो हि काय करेल बिचारा
आठवण तुझीच क्षण क्षणाला





हर श्वासात सख्या
तूच गुंतलायस
आठवणीत या केवळ
तूच समावलायस .....



तुझ्या ओल्या आठवणीत सये
मी नित चिंब भिजत असतो
पापण्यावर ओझे दुराव्याचे जरी
आठवणीच्या कुशीत निजत असतो

No comments:

Post a Comment