तुझं काही चुकताच...
लगेच पकडतेस कान...
याच तुझ्या अदेवर...
विसरतो मी माझे देहभान.
खट्याळ तुझ्या नजरेला...
भिडते जेव्हा माझी नजर..
खुदकन हसतेस गालात...
लाजत सावरतेस शालूचा पदर.
स्वप्नांना साथ तुझ्या ..
माझ्या स्वप्नांची...
डोळे मिटताच...
दिसे वाट नव्या दिवसाची.
No comments:
Post a Comment