तिने माघारी फिरून परतावं
मी मात्र षंढ सारख बघत रहाव
भूतकाळातले सारे किताब आठवून
पापण्यात अश्रुना गच्च आवळून धराव
नेहमी असाच करत आलो
मुखवटे चढवत गेलो
भावनेस लपावे म्हणून
शब्द गिळत राहिलो
इच्छा हि अनाहूत ठरते
सारच हे नकळत घडते
घडणारा प्रत्येक ते क्षण
आपल्याच क्षणांना मारते
पुरुषार्थ दुखवू नये म्हणून
सार बंद कप्प्यात ठेवले
त्यास माझा हताशपणा समजून
हे जगच माझ्यावर हसले
त्या दिसाला करून...
आत्मसमर्पण हे जीवन वाहिले
निर्दयी समाजान त्यास आत्महत्या
समजून सारे कायदे कलम शिकवले
एक एक चारोळी करत
प्रेमाची मी कथा मांडतो
शब्द पण अपुरे पडतात
चारोळीत जेव्हा भाव सांगतो
No comments:
Post a Comment