दोन पाखरे बोलत असता
शब्दांचे कंप हवेत कशाला ?
चोचीतून चोच टिपत असता
भुकेची ती आठव कशाला?
नजर नयनांशी भिडत असता
दर्पनाची ती गरज कशाला?
सोबत इतकी सुंदर असता
सौंदर्याची व्याख्या कशाला?
श्वास गंधाला ओळखत असता
स्पर्शाची ती गरज कशाला ?
मनात फुललेली प्रीत असता
बागेतली ती फुले कशाला?
दोन जीवांची एकी होता
दुसरी वाट हवी कशाला?
चालत असता त्या वाटेवर
तमा कुणाची हवी कशाला ?
दोन श्वास एकात मिसळता
उसना जीव हवा कशाला?
ठरलंच आहे सोबत मरणं
जगण्याची तर भाषा कशाला ?
No comments:
Post a Comment