रिक्त हात ते मज सांगती
लिहिले जे भावले मना
हाची एक घडला गुन्हा
झिडकारले कुणी इथे
तेची भावले तेथे कुणा
हा रोग ऐसा जाहला
क्षण शब्दांशी वाहला
दुखं ते धरुनी पाठीशी
गळा सुखाचाच गाईला
शब्दास फुल मी संबोधले
कागदी अश्रू ते वाहिले
हुंदक्यांचा गळा आवळूनी
पार डोळे कोरेच राहले
ऐसा रमलो काव्य बनी
शब्द ठेवती लेखणीस बांधुनी
मज पळवाट ना गावली
समाधिस्त झालो या राऊळी
रिक्त हात ते मज सांगती
मन भरले सद संगति
दाद ऐसी तुज इथे भेटली
पहा इर्षित होई नियती
No comments:
Post a Comment