खरच असं होईल ?...
महाल सोडून श्रीमंती
झोपडीत माहेराला येईल ?
खरच असं होईल ?
रिकाम्या पोटांना... अन्न
पोटभर जेवू घालील ?
खरच असं होईल ?
उजाडलेल्या छपरांना
पांघरूण झाकू देईल ?
खरच असं होईल ?
कोमेजलेल्या चेहऱ्यावर
उद्या हसू येईल ?
खरच असं होईल ?
'काल'ची साथ सोडून
'आज ''उद्याची ' साथ देईल ?
No comments:
Post a Comment