मन उदास होतं ना कधी कधी????
जगणं नकोसं वाटतं ना कधी कधी???
मग काय करायचं अश्यावेळी????
एका तान्हुल्या बाळाला जवळ घ्यायचं,
त्याच्या कडे हाताचं बोट द्यायचं?
तुमचं बोट जर त्या इवल्याश्या बोटांनी विलक्षण स्पर्शासकट धरलं,
तर समजा तुमचं दु:ख सरलं....
कुठल्यातरी बागेत जायचं,
रंगेबिरंगी फुलपाखराला पाहायचं,
तेच फुलपाखरू जर नकळत हातावर बसलं,
तर समजा तुमचं दु:ख सरलं....
जमलंच तेव्हा तर खळखळनाऱ्या झऱ्याला पहायचं,
पाउस असेल तर त्या टपोऱ्या थेंबांना पहायचं,
थेंबांना झेलून थेंबांनी नहायचं,
थंडी वाजून जर अंगात कापरं भरलं...
तर समजा तुमचं दु:ख सरलं....
गाईचं वासरू पहायचं,
उडणारं पाखरू पहायचं,
घाटातलं धुकं पहायचं,
"आयुष्य सुंदर आहे" हे मनात ठरलं
तर समजा तुमचं दु:ख सरलं....
कधी तरी हे करून बघा...
"निरागस गोष्टींमध्ये तुमची उदासीनता दूर करायची एक विलक्षण शक्ती असते."
No comments:
Post a Comment