पहाटेची वाट बघताना
रात्रीचाच लागतो डोळा
तुझ्या माझ्या स्वप्नांचे पक्षी
पापण्यांवर होतात गोळा .....
पांढरी कबुतरे सर्वजण मिळून
आकाशात सोडताना दिसतात
आणि टीचभर जमिनीच्या वादावरून
त्यांना धाराशाही करताना दिसतात ...............
मिठी या शब्दात
किती मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे ............
No comments:
Post a Comment