Tuesday, November 8, 2011

आठवते ती शेवटची भेट...

आज क्षणभर तुला..
दुर ठेवावेसे वाटले...
तुझ्या आठवणींना विसरून
पुन्हा एकद आठवावेसे वाटले...


तु माझा श्वास....
तु माझा ध्यास...
तु चांदण्यांची रात..
तु उमलणारी पहाट.




गोड साखर झोपेतून उठलो कि ,
मोबाईल मध्ये तिचा sms असावा ,
तो पाहताच असेल नसेल तेवढा ,
आळस झटकून निघून जावा .



येशील का ग तू...
पुन्हा हृदयाची खोली भरायला..
घूटमळलेल्या या हृदयाला....
तुझ्या प्रमात सावरायला..




तुला शेवटची पाहताना...
मन माझे भरून आले...
हृदयातील व्यथेने...
डोळे होते पाणावलेले



आठवते ती शेवटची भेट...
झालो होतो दोघेही स्तब्ध...
तुझ्या पासून दुर जाणार...
या आकांताने मी लिहिलेला पहीला शब्द..

No comments:

Post a Comment