हवाहवासा स्पर्श तुझा....
सुखद हर्ष देऊन गेला.....
ओठावरच्या लालीला....
गाली माझ्या उमटवून गेला....
ओठावरच्या लालीला तुझ्या...
अर्धे वाटून घ्यावे..
मिठीत येता तू...
माझ्यातच सामावून जावे....
ओठाला भिडता ओठ....
हृदय लागते धडधडायला...
ओठातील मधुर काव्य.....
शब्दात लागते उतरायला...
गालावरची खळी तुझ्या...
ओठांनी मला चाखायचेय..
तुझ्या संगतीने सखे
आयुष्याचे गणित अखायचेय...
आठवते तुला....
मी दिलेले तुला पहिले चुंबन....
लाजून तू मग...
केलेले ते प्रेमळ आलिंगन...
ओठावरच्या लालीचा तुझ्या....
रंग लाल लाल....
तिला उमटवून घेण्यासाठी...
आतुरलेला माझा गाल...
No comments:
Post a Comment