असे कसे हे नाते...
जे जुळण्या आधीच तुटून जाते...
दोन मने एक होणार..
त्या आधीच नशीब ते मोडून जाते.
खूप त्रास सहन केल्यावर शेवटी
सहनशक्ती चाही अंत होतो ,
सहन शक्ती संपली कि ,
माणूस कायमचाच शांत होतो .
एक एक चारोळी करत
प्रेमाची मी कथा मांडतो
शब्द पण अपुरे पडतात
चारोळीत जेव्हा भाव सांगतो
एकांतातली कविता
छान जमली
लिहिता लिहिता
मस्तच रचली ...
एक एक दिस काढतोय तुझ्याशिवाय ,
एक एक रात्र सरतेय तुझ्याशिवाय ,
मी तर तुझ्या आठवणीत पुरता वेडा झालोय गं ,
सखे तुला करमत का ग माझ्याशिवाय ?
No comments:
Post a Comment