माझ्या लेखनीतले शब्द...
सतत तुझ्याच भोवताली फिरतात..
तू त्यांना पाहून हसावे..
म्हणून तुला स्वतःत विणतात...
विरह हा प्रीतीचा
मजही करी घायाळ
डोळ्यांतून वाही आसवे
अन मनात हे बेहक ....
धुंद झाल्या कळ्या...
तु स्पर्श केलेस त्यांना म्हणून....
फुलायचे आहे त्याना....
तू त्यांना माळावे म्हणून....
लाजाळूचे झाड तू...
असे "मृगजळात" कसे उगवले...
तू हि फसलीस त्यात..
कि तुला हि त्याने आमिष दाखविले...
वाचन नको देओउस
काचेसम असते ते
नाही पेलवत आले तर
क्षणात चूर होते ते .............
आठवते तुला....
मी एकदा तुझे हात धरले होते ...
तेव्हा तुझे डोळे...
अश्रूंनी भरले होते...
तुला पहिले कि..
हृदयात वसंत फुलतो....
तू लाजून हसलीस कि.....
जीव माझा हळहळतो ...
तो थेंब मातीत विरला
विरून त्याने निसर्ग फुलवला
निसर्ग फुलवताना मात्र सख्ये
स्वतःचेच अस्तित्व विसरला
No comments:
Post a Comment