माउलीतला हक्काचा ईश्वर
सरते शेवटी खुणावतोय,
आई बनून जन्मला तो
लेकराकडून दुणावतोय..!!
ममतेची कदर पामराला
जन्मी ह्या उमगेल काय,
सरून जाईल करंटा लेक
माय पुन्हा जन्मेल काय..??
दुधाचं कर्ज नाही रे बाळा
कर्तव्याची जाण राहू देत,
माणुसकी म्हणून निदान
ममतेचा मान असू देत..!!
पंखात बळ भरलेलं पाखरू
आज घेतंय गगन भरारी,
घरट्यातल्या वार्धक्याला
आशा तुझीचं रे संसारी..!!
आतातरी वासरा कृतज्ञ हो
गोठ्यात हंबरतेय बघ गाय,
जिच्या आधाराने वाढलास
निराधार झालीये आज माय..!!
No comments:
Post a Comment