दुःखाच्या उन्हात अन सुखाच्या सावलीत,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप जगलोय मी..!!
प्रेमाच्या वर्षावात अन इर्षेच्या दुष्काळात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप हसलोय मी..!!
वासनेच्या धगीत अन पवित्रतेच्या शीतलतेत,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप चाललोय मी..!!
बालीशपणाच्या भातुकलीत अन पोक्तपणाच्या जुगारात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप हरलोय मी..!!
श्रीमंतीच्या सुर्योदयात अन गरिबीच्या सुर्यास्तात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप होरपळलोय मी..!!
शरीराच्या बाजारात अन मन-भावनांच्या सौद्यात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खरंच खूप थकलोय मी..!!
No comments:
Post a Comment