Thursday, November 10, 2011

बहरलेल्या ऋतूमध्ये प्रेमाचा गार वारा

कोरड्या तुझ्या शब्दातून
सखे अर्थ नवा काढला
नको नको म्हणताना
सहवास का वाढला ?


कोरड्या लाटा सये ओले किनारे आहे
ओले सहवास जरी कोरडे श्वास आहे
कोरडे शब्द जरी ओले अर्थ आहे
कोरड्या स्वप्नांचे खरंच अस्तित्व व्यर्थ आहे



घाबरण्याचा बहाणा सखे
जाणत का मी नाही,
तुझ्या हृदयाचा हरेक कप्पा
माझीचं वाट पाही..!!



बहरलेल्या ऋतूमध्ये
प्रेमाचा गार वारा
तुझ्या जवळ यायला
घाबरतोय जीव थोडा..



अदृश्य ओलावाचं तर भावनांचा
फुलवीत असतो सखे हरेक नातं,
नकळतपणे सुकेलं जप घालून
काळजाचं पाणी अन जीवाचं खत..!!



प्रेमातलं वाळवंट
वाटे तुझा दुरावा
शब्दांतून भेटे मग
सखे प्रेमाचा ओलावा


पावसाच्या सरी आणि तुझं हसणं सये
दोन्ही मिळून भिजवत असतात मला
कुणालाही दिसत नाही पण त्यामधील
हळव्या प्रेमाचा गहिरा तो ओलावा..........

No comments:

Post a Comment