माझ्या सखीच्या मागे ,
अक्खे मृगजळ जुंपलेले ,
पण तिचे मन मात्र ,
होते माझ्यातच गुंतलेले ,
काल अवचित मला..
"मृगजळ" भेटले.....
कधी फसवे.. कधी रुसवे....
त्याने मला गाठले...
तू सोबत नसताना....
सोबत असते तुझी सावली....
अडखळता मी कुठे....
साथ देते तीच पावलो पावली...
तू सोबत असलीस कि.
लोकांचे डोळे टवकारायचे....
त्यांनी पहावे म्हणून..
आपण दोघे अजून जवळ यायचे...
No comments:
Post a Comment