मेलेली मढी पुन्हा उकरून काढून
ताज्या मढ्यावर सरकारी कफन,
तोंडावर आपटवला राजा CBI ने
तेव्हा पुनरपी आठवला महाजन..!!
बुडत्याला उरला काडीचा आधार
स्वर्गीय मंत्र्यांच्या चौकशीचा हट्ट,
नव्या दूरसंचारच्या राजाची खेळी
मनसुबा स्पेक्ट्रमात बनायचं लट्ठ..!!
तेरी भी चूप अन मेरी भी चूप फॉर्म्युला
अधिच्यावर घालतो नंतरचा पांघरून
अळीमिळीच्या डावात पाय पसरतात
पर्वा नाही असो मग केव्हडही अंथरून..!!
परवान्यांच्या वाटणीतही अलिखित
मलई लाटण्याचा लाटला परवाना,
देशाचे सेवक हे सत्ता-खुर्चीची शोभा
मक्तेदारीचा हा सरकारी खजाना..!!
देवा आता तूच सावर रे गरिबाला
भोवळ आणी हे भ्रष्टाचाराचे आकडे,
हरलास तू ही ह्या पृथ्वीवरल्या स्वर्गी
सद्बुद्धी वाटपाचे प्रयत्न पडले तोकडे..!!
No comments:
Post a Comment