Wednesday, November 2, 2011

एक एकटा किनारा

एक एकटा किनारा

कोरा कागद वाळूचा
तू असा भिजवून जातो
सागरा तू लाटांच्या खुणा
निरोपात सजवून जातो

दूर वलयांचा खेळ खेळतो
तू मज शांत निजवून जातो
मी एक एकटा किनारा अजुनी
कना कणांचा बनतो ...
क्षणा क्षणात विरघळून जातो ...

No comments:

Post a Comment