Wednesday, November 2, 2011

कोण येथे गुरुवर्य ?

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

No comments:

Post a Comment