Tuesday, November 1, 2011

सण दिवाळीचा दारी उजळवी प्रकाश सोनेरी

सण दिवाळीचा दारी
उजळवी प्रकाश सोनेरी,
प्रेम सद्भावाचा दिवा
प्रकाशित होवो घरोघरी,
प्रेमभाव देण्याघेण्या
मायेची उब जपून ठेवा,
श्वास घेण्या सुगंधी
हिरवी झाडे जपून ठेवा,
प्रसन्न जगण्यासाठी
थोडी स्वच्छता जपून ठेवा,
सुखी होण्यासाठी
शांतता जपून ठेवा,
द्वेष, मत्सराचा अंधार दूरकरण्या
उज्ज्वल भविष्यासाठी,
आनंदाच्या क्षणासाठी
एक पणती जपून ठेवा..!!

तुम्हास आणि तुमच्या परिवारास....दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा..!!
खुश राहा......हसतमुख राहा..!!

No comments:

Post a Comment