Tuesday, November 1, 2011

जग माझे तुझ्या भोवती गुरफटले

आयुष्य म्हणजे खेळ
ज्याच्या त्याच्या इच्छांचा
आपल्या मनासारखा वागला नाही
तर तो माणूस चुकीचा....



जाऊदे ग
कशाला ताणून धरत आहेस?
मी केव्हाच मेलोय
आता कशाला रडत आहेस?




मागे काही शिल्लक नाही
रेंगाळलेल्या आठवणींशिवाय
डोळे काही पाणावत नाही
भिजलेल्या रात्रीशिवाय...
;



जग माझे
तुझ्या भोवती गुरफटले
तुझे मन बंद पाहून
प्रेम दारावरूनच परतले....

No comments:

Post a Comment