तुला पाहताना
मी हरवून जातो
देखण्या लोचनांचा
तो लपंडाव असतो
नको वीसकटू तो
क्षणांचा पिसारा
मोकळ्या बटानां
निजवू दे कळ्यांना
उडू दे पदर तो
वाऱ्यास मौज येते
मौन त्या मनीचे
स्तब्ध जीव घेते
तुला पाहताना
सुचते काव्य काही
उधळून तेज तू
निशब्द दिव्य दाही
स्मरतो तुला फक्त
लेखिले जे रम्य देखिले
झुळूक होवुनी स्पर्शिता तू
शब्द माझे होती फुले
No comments:
Post a Comment