Wednesday, November 2, 2011

सुखाचा कानमंत्र मन मागतय भिक.

सुखाचा कानमंत्र
मन मागतय भिक...
सुख दया हो सुख...
सुख?...अरे ती तर कधीही...
न भागणारी भूक...

धावतोय त्याच्याच मागे...
तरी दोन हात लांब,
शरीर पळतंय , बुद्धि म्हणते..
आता तरी थांब.

दमलो, श्रमलो, पुन्हा धडपडलो..
सुख दाखवतेय वाकुल्या..
उभ राहून म्हणते मला..
पकड़ रे मला सोनुल्या.....

त्राण न उरले, गर्भगळीत मी..
सुखाला आली दया...
जवळ आले......म्हणाले..
थोडीशीच करेन हा माया...

आनंद झाला, सुख आल..
समय सरला, जुन झाल..
ज्याचा वाटला क्षणिक हर्ष...
मृगजळाचा होता तो स्पर्श..

सुखाने काढला आपला मुखवटा..
आश्चर्याने विचारल..
तुझाही चेहरा खोटा ????

सुख हसले, डोळे मिटले...
गळले दोन अश्रु..
म्हणाले....दुःख ही माझाच भाऊ..
त्याला कसा रे विसरु ???

सुखाला म्हटले....तुला मिळविण्याच आहे का रे यन्त्र ???
हसले, म्हणाले....जवळ बस इकडे...
देतो एक सुन्दर कानमंत्र...

आमदानी आणि गरज यातली...
तफावत जेवढी जास्त...
असेनच मी तिकडे...आणि..
रहाल तुम्ही मस्त....

तेव्हापासून झालो आहे..
सुखाचा मी मित्र...
ऐकून हा कानमंत्र...
तुम्ही पण व्हा पात्र.
amol ghayal

No comments:

Post a Comment