Monday, September 26, 2011

सखे हातात हात घेशील जेव्हा

सखे
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधरातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...



शोध घेण्यास माणसाचा
जितका बाहेर पडत जातो
फिरून मी येतो तिथेच
स्वतःत खोल शिरत जातो...


तुझी माझी वेळ कधी
एक होऊ शकत नाही
ओढून ताणून समन्वय
नेक होऊ शकत नाही...

मुंबाईच्या आशिर्वादाने..

या रचने तील प्रत्येक ओळीचा पाहिला शब्द पहा...

मुंबाईच्या आशिर्वादाने..
बनला हा खेल सारा...
ईथे येणारया प्रत्येकाला तिचाच तर सहारा...

आमच्या या मातृभूमिला...
महानगराचे चे स्वरुप..
चिंता हिची करतात नेते तर कधि देतात..
चहाट्या चे रुप..

अंगणात पसरला..

लिहिला मी प्रत्येक शब्द...
फ़क्त माझ्या साठी..
नकळत त्यांचे नाते..
जूळले तुझ्याशी..


अंगणात पसरला..
सुगंधी सडा रातराणीचा...
जसा अवती भोवती..
भास माझ्या राणीचा...



टिमटीमणारा दिव्याला..
का काळजी अंधाराची..
अंधाराला चिरुन तोच..
ज्योत देतो प्रकाशाची..

आशा राजकुमारीची वाट बघत आहे...

आशा राजकुमारीची वाट बघत आहे...
जी माझ्या जीवनात आनंदच आनंद घेऊन येईल
जिच्या नाजूक डोळ्यांमध्ये फक्त माझी प्रतिमा दिसेल
घड्याळाच्या कट्या प्रमाणे माझ्या प्रत्येक अडचणीत
आयुष्भर साथ देणारी असावी...........अमु

मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.

मी डेटिंग केले नाही......
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..

बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही..

अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला, कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.

जगायला फक्त कधी कोरडं प्रेम नसाव

kahan koi mila jispe dosti luta de,
har ek ne dhoka diya kisko bhula de,
apne dard dil me rakhte hai hum,
bayaan kre to mehfilon ko rula de.



जगायला फक्त कधी
कोरडं प्रेम नसाव
मायच्या ओलाव्याची
त्याला जोड हि असावी ....


मृगजळामागे धावूच नये
खोटी स्वप्न पाहूच नये
प्रेम फक्त एक मायाजाल आहे
जाळ्यात त्या अड्कुच नये



मनाचे मनाला वाचन
हे समजून घेणारे असावे
नुसती नजर फिरूउन
चाळनारे नसावे ...........




एक खोटी आशा
मनाला भुलवणारी
कधी हि न पूर्ण होणारी
आयुष्य फक्त खेळवणारी .




अर्ध्यावर येऊन मी
मागे वळून पाहते
कुणीच नाही सोबतीला
जिथे एकटीच मी राहते ............

पण पुढे मार्ग मज
एकटीनेच पार करायचाय
कुणीतरी भेटेल सोबतीला
याचा शोध घ्यायचाय........

मी एक स्वप्न

मी एक स्वप्न
नकळत तुज पाडलेल
मृगजळावर जैसे तुझे
भाबडे मन जडलेल .


Mohabbat na hoti to gazal kaun likhta
kichad k phul ko kamal kaun kehta
pyar to kudrat ka karishma hai
varna ek lash k ghar ko 'TAJMAHAL'kaun kehta....!

गालात तुझ्या उमलली खळी..

तिच्या स्वप्नातचं मला
तिच्यासोबतचं जाग येईल,
तिच्याचं अल्लड मनाचा
मन माझं माग घेईल..!!




गालात तुझ्या उमलली खळी...
मनात माझ्या झाली घेलीमेली...
स्पर्श करावा तिला मनात आला विचार...
बिघेडेल ती म्हणून दुरूनच केला पाहुणचार..



जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करु नका
जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु
अशा व्यक्तीशी करा जी तुमचे जग सुंदर करुन टाकेल.

शब्दांची जाण तर तुला जास्त होती

नावात माझ्या सामावालीस तू...
हृदयात माझ्या कधी होतीस राहिलेली तू..
क्षणाला क्षणाला आठवण तुझीच ग...
माझा प्रत्येक क्षण जागवून गेलीस तू..



दिग्गजा समोर माझे
काव्य अपुरे राहिले
पुढे जावून ते फक्त
चार ओळीचे चारोळी बनले



डोळे बंद करायला
सध्या मी घाबरतो
स्वप्नातून सत्यात येण्यास
हा जीव इन्क़ार करतो


शब्दांची जाण तर तुला जास्त होती
म्हणून तर माझी सख्या ,गाणी धुंद होती
तू होतास सोबतीला ,म्हणून प्रीत जवळ होती
नाहीतर ती वेल,....अशीच भकास होती ......

जेव्हा तु उदास असायचीस

जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुख:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
कि मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............
पण...
तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही??"
पण आता
जेव्हा तु नाहीस
मग या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझ तोच प्रश्न विचारी
कि "तु मझि होशिल?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
माझ्या त्या हास्याकडे पाहुन तु पुन्हा
तेच म्हणशील
"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही.......???

स्वप्नात जगताना ना जाणीव सत्याची

prem ek swapn aste saglyacha aushyatle.....
anek rangat ranglel ....
fulan madhe fulale....
pakhara sange udnar......
prem aste jivanat annand bharnare swapn..


किती शब्द मांडू मी...
सारे तुझ्याच साठी...
प्रत्येक शब्दात सामावालीस तू...
तरीही प्रत्येकाला आस तुझ्या भेटीची..


ह्या डोळ्यावर
किती ते ओझ
कधी स्वप्नावर जगण
कधी आसवाच बोझ



स्वप्नात जगताना
ना जाणीव सत्याची
सत्यात जगताना
जाणीव फ़्क़्त मरणाची

तू आलीस माझ्या जीवनात सुखाचे क्षण घेऊन

nakar tuj detana
oth tichehi hote kaple
dukhh tujhe n pahnya
dole tine kshnat jhakle ...........

सूर्याच्या प्रतेक किरणामध्ये तू आहेस....
माझ्या या हृदयात फक्त तुझाच चेहरा दिसतो
पाहिले तुला दुसऱ्याबरोबर तर होतो माझा जीव खालीवर..
काय करू तुझ्याविना काही सुचेना....
झालो आहे तुझ्या प्रेमामध्ये वेडा.



तू आलीस माझ्या जीवनात सुखाचे क्षण घेऊन
काय करू काही सुचेना जिथे बघावे तिथे तू दिसतेस
उठता, बसता, चालता, बोलता मनात सारखी तूच येतेस
काय करू काही समजत नाही तुझ्याबरोबर बोलत असलो
की तुझा चेहरा समोर येतो आणि माझे मलाच भान राहात नाही
का कुणास ठाव पण तू जे काही बोलतेस ते मनाला भावते
कितीही प्रयत्न केले तरी मला तुझे शब्द टाळता येत नाही
तुझ्या बरोबर बोलत असताना ते तीन अक्षरी शब्द बोलावेसे वाटतात
पण तेव्हा मी स्वतःलाच विचारतो.....विचारू की नको विचारू की नको???
या हृदयात एकीसाठी जागा शिल्लक होती....पण आता असे वाटते की,
ती जागा तू तर नाही ना घेतलीस????
म्हणून मनातल्या मनात सारखा बोलतो..
तू आलीस माझ्या जीवनात सुखाचे क्षण घेऊन.

तुझे नाव मी वाळूत लिहिले ते वाहून गेले

शिप्ल्यात साठवले अश्रुचे तळे
वाटले पडतील मोती
पण उरले आठवणीचे सुकलेल तळे



mitlelya papnitahi te
prem hote jagale
tuj n kadhi kalale je
man hote vijlale........




तुझे नाव मी वाळूत लिहिले ते वाहून गेले
तुझे नाव मी हवेत लिहिले ते उडून गेले
मग तुझे नाव मी हृदयात कोरले

मोबाईलची लावणी----- ----

मोबाईलची लावणी----- ----

सिमकार्ड नवे,ड्युएल हवे
राया जरा तुमीच इचार करा
माझा मोबाईल रिचार्ज करा!!धृ.!!

त्यात फोटूची सोय तर हवी
ब्याटरी बी पावरबाज नवी
लई गाणी रिकार्ड व्हावी
कानी कर्णे लावून ऐकावी
हातात घेऊन ऐटीत त्याला झोकबाज कव्हर करा !!१!!

कुठलेबी कार्ड चालेल
प्रीपेडची सुविधा असेल
राती मेसेज तुमचा येईल
माझा रिप्लाय लगी जाईल
रंग तांबडा,फोन देखणा न्यारा त्याचा नखरा !!२!!

त्याला कव्हर मी घालीन
नित हृदयाशी ठेवीन
तुम्हासंगे रोज बोलीन
असा फुलावानी झेलीन
हातात माझ्या देऊन त्याला हात हाती धरा!!३!!

माझा तुझ्या सोबतचा.. प्रत्येक क्षण वेगळा आहे..

शब्दात तुझे रूप मांडता येत नाही ,
कारण त्याला शब्दच अपुरे पडतात,
तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
अजूनही माझ्या ओठीच अडतात....



विचारांचे खेळच एक शतरंज आहे
कधी जय कधी मात
मनात एक द्वंद आहे...


तुझ्या त्या वेड्या प्रेमाच्या सये
अजून खुणा नाही मिटल्या
जेवढा केला पुसायचा प्रयत्न मी
तेवढ्याच त्या ठळक उमटल्या



तस्वीर तुझी अजूनही..
डोळ्यात भरुन येते..
दुर असलीर तरी...
हृदयात घर करुन जातेस..


मृत्यू आला की फक्त...
शरीर सोबत घेऊन जातो...
आत्मा मात्र प्रेमासाठी..
सतत भटकत राहतो..

माझा तुझ्या सोबतचा..
प्रत्येक क्षण वेगळा आहे..
तु दुर असलीस तरी..
मनात पसारा सगळा आहे

बाबा ss मला जगू दे ना रे..

बाबा ss मला जगू दे ना रे..
बाबा,माझं काय चुकलं रे
निष्पाप जीव का मारता रे
जगण्या आधीच तोडता रे
सुंदर जग पाहू तर दे ना रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......

तुझा अंश संपवू नका रे
मुलगा मुलगी भेद का रे
माझ्यात कमीपणा नाही रे
मुलासारखे कर्तुत्व करेन रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......

चार महिने आधीच टेस्ट रे
निदान "मुलगी" नाराज कारे
भविष्य उज्वल करीन मी रे
अस्तित्व माझे कुचलू नका रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......

देशात आज आरक्षण ५० % रे
भ्रूण हत्या महा-अपराध रे
पोटच्या गोळ्यास चिरडू नका रे
हे "देवाचे" विश्व मला पाहू द्या रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......

आई गा न ग अशी अंगाई

आई गा न ग अशी अंगाई
ज्याने झोपेल माझी ताई

अंगावरच्या घावावर घाल थोडीशी फुंकर
तेवढेच ती मानेन तुजे उपकार

आयुष्भर ओझ म्हणून पाळल तिला
आत्ता तरी दे पाज मायेचा पाझर तिला

तिच्या येण्याने वंशाचा दिवा विझला
आत्ता तिलाच तिच्या अश्रुने भिजवला

स्री च्या पोटी स्री चा जन्म झाला
म्हणून सारा आभाळ कोसळला

आत्ता तरी जाऊ दे तिला सुखान
सार आयुष्य तीच व्यापलं तुमच्या दुखाने

Friday, September 23, 2011

मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.

मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्नांना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माझ्या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.
मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तरीही....
माझ्या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय.....

तूझ्या नजरेला कधी ती प्रित नाही कळली,

रेल्वेच्या डब्याला...
शत शत चाके..
माहीत आहे तुला..
पण तुझं चालत नाही डोके..



जपशील का गं तू,
आपलं नातं जिवापाड ...
कि कोंडुन ठेवशील त्याला..
कोनाड्यात एका पडद्या आड..



भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही.म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.



इथल्या प्रत्येक वाशाला आता कोंब फुटायला हवेत
पक्षी कोणत्याही फांदीवर आता निर्धास्त राहायला हवेत,
तुला काय हवे हे तू ठरवायचे आहे.
माणूस म्हणून मरायचे कि मानव म्हणून जगायचे आहे.




नजरेत तूझ्या प्रेमाचे
हजार रंग भरलेले,
त्यातल्या काही रंगाने
आयुष्य माझे सजलेले,


हातावरच्या रेषा माणसाचं भविष्य सांगत असतील
,तर कारखान्यात काम करताना ज्याचे दोन्ही हात
मशीनमध्ये कापले गेलेत त्यांना काही
भविष्यच नसतं असं कुठे आहे?


तूझ्या नजरेमध्ये वेडी
प्रीत माझी बहरली,
तूझ्या नजरेला कधी
ती प्रित नाही कळली,

आज पुन्हा एकदा छोटासा प्रयत्न केला आहे...

आज पुन्हा एकदा छोटासा प्रयत्न केला आहे...

आठवणीत तुझ्या मी..
आठवणीत माझ्या तू.
दोघे असे गेलो हरवून..

आठवणी बोलतात..
आठवणी खेळतात..
आठवणीत जावे भिजून..

सहजपणे त्यात आपण...
दुभागले जातो नकळत..
सात सूरात जरी भिजलो त्यांच्या.
शून्यातच आपण तळमळत..

तुला चोरुन पाहताना...

रात्र भर आता डोळे..
तुझ्या प्रतिक्षेत जागतात..
तु दिसलीस कि ते...
वेड्या सारखं वागतात..



तुला चोरुन पाहताना...
तु एकदा पाहिल होत...
मनात खंत एकच राहीली तेव्हा,
तुझ्याशी नजरा नजर करणं राहील होतं...



माझ्या सोबत खेळताना..
तु लहान होऊन जायचीस...
अशी कशी ग "आई" तू...
माझ्या मनातले जाणून घ्यायचीस..




चुक माझीच होती..
मी तुला फ़क्त दुरुनच पाहिलं...
अन तुझ्या जवळ येऊन...
दोन शब्द प्रेमाचे बोलायचं राहीलं..

देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

माझी कविता वाचताना

हरकत नाही…
“अक्षर छान आलंय यात !”
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते…

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर…
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही…

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

माझीच हार आता माझ्या शब्दात आहे

हे सूर कोणते हो, हे कोण गात आहे
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे

नाही कधीच केली चिंता पराभवाची
माझीच हार आता माझ्या शब्दात आहे

बंधास तोडले मी , प्रेमास त्यागले मी
माझाच मी असा माझ्या मनात आहे

व्यर्थ सर्व पिडा , खोटे तुझे बहाणे
कोणास बोल लावू ,सारे उरात आहे

भेटीस टाळल्याचा आनंद आज आहे
निरोप आज घेतो मी हा सुखात आहे

येणारा दिवस तुझ्या आठवणीने भरलेला असू दे

येणारा दिवस तुझ्या आठवणीने भरलेला असू दे
तुझ्या याच आठवणी मनाला आनंद देऊन जातात
दिवस निघून जातात पण तुझ्या सहवासात घालविलेला
प्रत्येक क्षण मला तुझी आठवण करून देतो........अमु





डोळे मिटले की तू दिसतेस
डोळे उघडले की हे जग !
तुलाही मी दिसतो का ?
जरा डोळे मिटून बग.......

आपण लग्न कधी करायचे?

मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारून सांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?

मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.

एका मुलाने मरणाच्या अगोदर २ masage केले

एका मुलाने मरणाच्या अगोदर २ masage केले
एक प्रेमिकाला आणि एक मित्राला
मी जातोय उत्तर लवकर द्या.
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले
तू कुठे जातोस ?मी कामात आहे, नंतर भेटू
... ... ... हे वाचून त्याला खूपच दुख झाले
दुसरे उत्तर मित्राचे आले
अबे कमीने थांब , एकटा कुठे चालास,मी पण
येतोय
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला amuuuuuu(तूच खरा मित्र....)

आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले
म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे.......

Thursday, September 22, 2011

९ नऊ तासाच्या प्रवासात..

मित्रांनो मी हा एक नवीन प्रयत्न केला आहे.. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा..

९ नऊ तासाच्या प्रवासात..
७ सात तास तर तू शांत होतीस..
० शून्यातून मी सुरवात केली..
२ दोन क्षण वाट पहिली..
3 तिनदा तुझ्या प्रेमात पडलो
९ नऊ तासाच्या प्रवासात..
१ एकदा मलाच शोधात राहिलो..
२ दोनदा तुझे सहकार्य मिळाले
० शून्यातून सुरवात केली...
७ सात तास तर तू शांत होतीस.

मनात सत्य असेल..

आज ही तुझी मी..
आतुरतेने वाट पाहतो
तु आली नाहीस की..
हळूच डोळ्यातून अश्रु वाहतो


तुला ठेच लागताच..
इजा मला होई...
चुक काही तू करता...
सजा मला होई..



लाल लाल लालीने
ओठ तुझे रंगलेले...
तुझ्या एका स्पर्शा साठी...
ओठ माझे आसुसलेले..


मनात सत्य असेल..
तर प्रत्येक गोष्टीला समोरे जाता येते..
कटू पणे वागाल तर...
सर्व काही निरर्थक होते..



तुला हसवायला,
मला विदुषक बनायचय..
अन तू खुदकन हसलीस कि...
तिथेच मारून जायचय..

हात कुणाकडे पसरविता, स्वाभिमानानी तरी कसे जगायचे ?

आधार आभाळाचा कधी हरविता
पक्षांनी तरी कुठे बागडायचे,
साथ चांदण्यांनी कधी सोडता
आभाळानि तरी कस रडायचे

अथांगता सागराची कधी हरविता
मास्यांनि तरी कुठे लपायचे,
साथ पाण्यानी कधी सोडता
सागरानी तरी कसे सावरायचे

पौर्णिमेच्या रात्री चंद्रानीच
आभाळ नटायचे,
अमावस्येच्या काळोखाला तरी
त्यानी कसे झाकायचे

नकळत आज वाऱ्यानेही
कधी वाहने थांबायचे,
हतबल होऊन बघण्याशिवाय
सृष्टीनेतरी काय करायचे

श्वासालाही मोहताज या जीवाला
सांभाळता नाकी-नऊ यायचे,
अश्रुचे थेंब लपविता
कधी त्यांचे बांधही फुटायचे

कोऱ्या कागदावर लेखणीतून
कितीतरी स्वप्नं उतरायचे,
लेखणीने कधी साथ सोडता
स्वप्नही तिथेच मिटायचे

हात कुणाकडे पसरविता
स्वाभिमानानी तरी कसे जगायचे ?
शेवटी पोटाच्या आगीत
स्वाभिमानही " भस्म " व्हायचे

थेंब भर अश्रुंची किम्मत...

आता प्रत्येक क्षणाला..
तुझी कमी भासते..
अश्रु दाटतो पापणी वर..
अन मनात आठवनींची गर्दी वाढते


थेंब भर अश्रुंची किम्मत...
कुणा कळता कळेना...
सुखात येते पापणी भरुन...
दु:खात मात्र ते आवरेना..



दिवस भर हसल्यावर..
मी रात्री मनसोक्त रडून घेतो...
दुसरया दिवशी पुन्हा मग...
हसायला अन हसवायला तयार होतो.

तु दुर जाताना..

तुटलेली नाती आता..
पुन्हा जोडायची आहेत...
पुढच्या पावलावर..
पुन्हा नवी नाती जोडायची आहेत



निवडूंगाला काटे असतात..
म्हणून ते जगणे सोडत नाही..
ऊन वारा पावसात ते..
मोडून पडत नाही...



अंधारली रात्र आता..
झोपले सारे साथी..
माझे डोळे उघडे अजुन ही..
फ़क्त तुझ्या साठी..



तु दुर जाताना..
माझे डोळे वाहत होते...
तू सोबत असताना जे..
फ़क्त भरुन आले होते..


तुच तर धरलास हात...
अन दाखवलास जिवनाचा मार्ग...
मी तुझ्या मागुनच चालत राहिलो..
पण तू अर्ध्यावरच गाठलास स्वर्ग..

तुझा मोह काही केल्या सुटेना...

कधी बघ जगून माझ्या सारखं...
स्वछंदी या मनाला भिरकू दे पक्षासारखं..
हे आकाश कर आपलसं...
हृदय असूदे मात्र अथांग सागरासारखं..


गालावर तुझ्या ओघळलेला..
तो थेंब काही सुकेना...
त्याला ही कदाचीत..
तुझा मोह काही केल्या सुटेना...



चांदण्यांच पांघरुन घेऊन..
दिवस गेला झोपी...
आकाश मात्र जागे..
घालून चांदोबाची गांधी टोपी

सकाळची वेळ होती

सकाळची वेळ होती
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
बाहेर डोकावत होतो ...

अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
जणू माझ्या कवेत ...

तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
तिची ती नजर पहिली ...

साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
तिच्यावरच खिळली ...

आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
अलवार बाजूला सारत ...

ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
माझ्या जवळ आली ...

जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
उठ लवकर, बसू दे मला ...

काय राव काय सांगू कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..

म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
मनात भरल्याशिवाय राहणार नाही

हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...


आमोल घायाळ

Tuesday, September 20, 2011

"डोळ्यात पाणी आणणारी कथा!"

आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गे...ले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.

तिने शेगडी पेटवली. तांदळाच्या डब्यात उरलेला मूठभर भात तिने कुकरमध्ये शिजवायला लावला. शिजवतानाच त्यात थोडे कांदे आणि मसाला घातला. कुकर व्हायची वाट पहात ती ओट्याजवळ उभी राहिली. कुकर नवर्याने हौसेने आणलेला. घरातला बाकीचं सगळंच मोडून झालं होता, तेवढा एक कुकर तिने अजून विकला नव्हता. बाकीचं समान असंच कुणी दिलेला लग्नात. तेव्हा जे कोणी यायचं काय काय घेऊन यायचं, आणि तीही आल्या-गेल्याचा करण्यात रमून जायची. पण मग २ वर्षात... तिला त्या दिवसाच्या आठवणीने गरगरल्यासारखं झालं. अजूनही तिला खोटं वाटायचं, एखाद्या स्वप्नासारखा. तिला मिठीत घेऊन गुदमरवणारा नवरा जेव्हा त्याचा एक थोटा हात आणि तुटका पाय घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने घरी यायचा तेव्हा तिला उन्मळून जायला व्हायचं. अपघातातून सावरल्यावर तिने त्याला सरकारी दाखला आणून एखादी नोकरी करण्यासाठी सुचवला. महेश तेव्हा जेमतेम वर्षाचा होता. नवर्याने ऐकलं नाही. त्याचे मित्र यायचे आधी आधी, काही करण्यासाठी सुचवून पाहायचे. तो झिडकारायचा , म्हणायचा, 'पांगळा आहे म्हणून दया नको तुमची.' मग महेशकडे आणि दाराआडून पाहणाऱ्या तिचा निरोप घेऊन आलं माणूस निघून जायचा. काहीच सुचला नाही कि तो कुबड्यांवर स्वतःला ढकलत ढकलत निघून जायचा कुठेतरी. मग घरी यायचं घामाघून होऊन, तिच्याकडे बघायचाही नाही. भरपाईचे पैसे घराखर्चात आणि महेशाला शाळेत घालण्यात संपले. महेशाची शाळा सुरु झाल्यावर तिने उमेदीने स्वत नोकरी करू पाहिली. पण तिने आणलेलं काही तो खायचा पण नाही. महेशला सांगायचा कि तो काम करेल, त्याला खूप मोठा करेल. त्याला हसवायचा. आणि मग स्वताचे डोळे टिपत आकाशाकडे बघत बसून रहायचा. एक दिवस त्याने गाडीखाली जीव द्यायचा प्रयत्न केला. लोकांनी वाचवला, घरी आणला. तेव्हापासून तो अजून आक्रसत गेला. ती जवळ आली कि रडायचा. तुझ्या जीवावर जगतो, मरू पण शकत नाही आपल्या मर्जीने म्हणायचा. ती कामावर गेली कि निघून जायचा कुठेतरी. कोणाकडून तरी पैसे मागून महेशला काही घेऊन यायचा. एक दिवशी कोणीतरी म्हणाला कि जगतो कसा मस्त बायकोच्या जीवावर. ते जिव्हारी लागल्यागत घरी आला, आणि तिला नोकरी सोडायला लावली.

मग घर रिकामं होत गेला. महेशचा रिझल्ट लागला शाळेचा आणि आता ५वित प्रवेश घ्यायचा होता. भरायला पैसेच नव्हते. उद्यापासून शाळा सुरु होणार होती. महेश विचारायचा पुस्तक, वही, कंपासपेटी केव्हा घ्यायची. ती वेळ मारून न्यायची. मग बाबाकडे गेला कि बाबा त्याला काय काय सांगून रिझवायचा.

तिने कुकर उतरवला. ताटे घेतली. तेवढ्यात महेशचा बाहेर आवाज आलं, 'आई, बाबा आले. आणि मला नवा शर्ट आणि पुस्तक पण आणलंय.' गोष्टींचं पुस्तक घेऊन महेश तिला बिलगला. त्याच्या खांद्यावर नवर्याने नवा शर्ट पांघरला होता. तिला आवडणारा आकाशी रंग.... 'आणि बाबांनी हे तुला दिलंय. तिने पिशवी घेतली. त्यात एक फूल आणि डबा होता श्रीखंडाचा. तिने फूल ओट्यावर बाजूला काढून ठेवलं.

काल रात्री त्यांचं बोलणं झालं. तिने त्याला उरलेले पैसे दिले होते.

कुबड्या भिंतीच्या कडेला टेकवून तो खाली बसला. महेश त्याच्या बाजूला बसून पुस्तक वाचत होता. तिचे डोळे उगाच भरून येत होते. तिने ताटात भात वाढला. कडेला श्रीखंड वाढलं.

तेवढ्यात मनी आली दारातून आणि म्याव म्याव करत महेशच्या पायात जाऊन बसली. महेश तिचे लाड करत तिला गोष्ट सांगायला लागला. आणि ते वेडं मांजर पण मान त्याच्या मांडीवर ठेवून जसं ऐकायला लागलं.

किती दिवसाने ते गप्पा मारत मारत एकत्र जेवले. खूप दिवसांनी आज गोड खायला होतं. महेशने आवडीने श्रीखंड खाल्लं. आणि मनूने पण महेशच्या ताटातलं श्रीखंड खाल्लं. जेवण झाल्यावर गप्पा मारत ते तिथेच बसले. मनू महेशच्या मांडीवर गुपचूप झोपली होती. हळूहळू बाबाची गोष्ट ऐकता ऐकता बाबाच्या कुशीत महेश झोपून गेला. तिने ताटे उचलली. कुकर आणि श्रीखंडाचे रिकामे भांडे बेसिन मध्ये ठेवले. ओट्यावरचे फूल तिने हातात घेतलं आणि नवर्याकडे पाहिलं. तो भिंतीला मान टेकवून झोपला होता. त्याचा रापलेल्या गालांवर, खुरट्या दाढीत त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपले होते. तिने ते फूल घेतलं, आपल्या बाजूला ठेवलं आणि तिथेच लवंडून ती झोपली........
दुसर्या दिवशी पेपरात आलेल्या बातमीत अपंग तरुणाची बायको आणि मुलासह आत्महत्या एवढाच मथळा होता. त्यांची घरभर विखुरलेली स्वप्नं, त्यांच्या गप्पांचे आवाज, गोष्टीचं नव पुस्तक, एकदाच घातलेला आकाशी शर्ट, मरून पडलेलं मांजर आणि तिच्या कुशीत सापडलेलं कोमेजलेलं फूल ह्यांचा उल्लेख तसा महत्वाचा नसतोच म्हणा

लेखक - आमोल घायाळ

Monday, September 19, 2011

तुझे प्रेम म्हणजे, माझ्यासाठी नवा अनुभव आहे,

प्रेम हे प्रेमचं असतं
बस त्या कळत नकळत होणा-या गोष्टी असतात.
कधी इतक्या जवळ येतात की जग सुंदर करुन जातात.
तर त्याच कधी इतक्या लांब जातात की जगणे मुश्कील करुन जातात.


रोपलेल्या रोपालाही पाण्याची गरज असते
मातीच आधार आणि सूर्य च प्रेम लागतं
जीव देन सोप पण जीव लावण कठीन असत ....


तुझे प्रेम म्हणजे,
माझ्यासाठी नवा अनुभव आहे,
कधी सुख तर कधी,
आठवणीचा पुर आहे...

तुझी आठवण म्हणजे,

तुझी आठवण म्हणजे,
जसे पाण्यावरील तरंग....

एका आठवणी मागे,
उठती आठवणींचे रंगच रंग.

गुलाबी भेटीचा एक क्षण ..........

एक क्षण .......... गुलाबी भेटीचा एक क्षण .......... नाटकी रूसव्याचा एक क्षण .......... अबोल प्रेमाचा एक क्षण .......... मन दुखवयाचा एक क्षण .......... तुला हसवायचा एक क्षण .......... हटकून विसरण्याचा एक क्षण .......... विसरून आठवयाचा एक क्षण .......... मनमुराद भांडायचा एक क्षण तू निघून जाण्याचा अन सर्व स्वप्नांचा पसारा मी मांडायचा एक क्षण .......... क्षणांत निसटून जाण्याचा एक क्षण अजूनही तुझीच वाट पाहत राहण्याचा

गणपती बाप्पा माझ्यासाठी एवढं तरी करशील का

मला वाटते तेंव्हा होवो
घणघण घंटा शाळेची
अभ्यास सारा पटपट संपुन
मधली सुट्टी खेळाची
कितीही खेळलो तरी मला तू
पहिला नंबर देशील का?
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

बाबा गेले ऑफिसात अन
आई गेली भूर कुठे
एकटाच मी घरात आणि
सगळे गेले दूर कुठे
उशीर त्यांना झाला तर तू
धम्मक लाडू देशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

रूप तुझे पाहण्याजोगे ओठ तुझे गुलाबाचे डोळे तुझे मृगाचे

प्रेम म्हणजेकाय ते !!!!! जीव लावल्याशिव ाय समजत नाही !!! प्रेम म्हणजे कायते !!!!१ ओढीने जीव कासावीस झाल्याशिवा य समजत नाही !!! ...प्रेम म्हणजे काय ते !!!! जस मेल्याशिवा य स्वर्ग दिसत नाही!!!! प्रेम म्हणजे कायते !!! तिच्या सुखाशिवाय आपला घास गिळवत नाही!!!


हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो. त्यावर 'विचार' करायला एक मिनिट. ते समजावून सांगायला एक तास. समजून घ्यायला एक दिवस. जाणून घ्यायला एक आठवडा आणि निभवायला एक 'जन्म'




सौंदर्य तुजे वाखण्याजोगे रूप तुझे पाहण्याजोगे ओठ तुझे गुलाबाचे डोळे तुझे मृगाचे केस तुझे मऊ मुलायम जसे स्पर्श मोर पिसांचे पाहताक्षणी मी हरवावे असे जादु तुझ्या नजरेचे माझ्यासाठी जिला तु बनविलास आभार मानु किती त्या देवाचे ....

त्या पायवाटे वर चालताना माझी सोबती बन

आताही तू माझ्या स्वप्नात येऊन..
माझ्याशी भांडशील का...?
खरचं आजही हृदयात तुझ्या..
पुन्हा मला जपशील का...?



त्या गहीवरल्या क्षणांना..
साठवून ठेव मनात..
डोळे मिटून मग..
हरवून जा त्या क्षणात..



त्या पायवाटे वर चालताना माझी सोबती बन
माझा प्रवास होईल सुखद तु साथ दिलीस तर. घेऊ हातात हात आणि छान एखादी चाल म्हणु.
पाऊला सोबत पाऊल टाकत थोडे romantic नखरे करत. तोल गेला तर सावर मला आणि असेच प्रेम कर..

सुंदरमुलीभाव खातात...

सुंदरमुलीभाव
खातात...
सहज दर्शन
द्यायला महाग
का होतात?

'सुंदर आहेस' म्हटलं
की तेव्हा नाक
मुरडतात...
पण पुन्हा
पुन्हा जाउन
आरशात का
पहातात?

सुंदरमुलीबोलायला जड
होतात...
पण झलक
द्यायला आतुर
का असतात?

सुंदरमुलीशेफारून
जातात...
'कौतुक' करणाऱ्यालाच
कमी का लेखतात?

'मला आवडलं
नाही' हमखास
सांगतात...
पण 'पुन्हा
बोलायची' वाट
का पहातात?

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...
तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही..
पण प्रत्येकवेळी कुठले कारण शोधू?
अन तिने फोन उचलल्यावर माझे ततपप कसे थांबवू?
बोलायचे असते एक, अन निघते ओठांतून भलतेच..
ती स्वतःतच मग्न, पण कळतं तिलाही सगळं..
तिला राग येईल असे वागून फायदा नाही,
अन इथे माझ्या अस्वस्थतेला तिच्याशिवाय उपाय नाही!
बहाणे तयार करून ठेवतोय, देव पाण्यात घालून बसलोय,
ती प्रसन्न व्हावी ह्याकरिता आराधना करतोय..
दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस, तिचेच स्मरण अन तिचेच चिंतन..
एकदा हो म्हणाली कि चिंता मिटली,
पण ती वेळ लवकर यावी इतकीच माझी घाई!

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,पण

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,ती आपली खास मैत्रीणअसते.जी आपल्याला रोज SMS करते,आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,ती आपली खास मैत्रीणअसते.जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,ती आपली खास अशीमैत्रीण असते.तिची पण अवस्था काही निराळी नसते,कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,ती आपली खास अशी मैत्रीण असते.ती कधी कॉलेजला नाही आलीतर,जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,ती आपली खास मैत्रीण असते.कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपलीबाजू घेऊन बोलते ना,ती आपली खास मैत्रीण असते,जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,छान होती...अशी एक दाद देते ना,ती आपली खास अशी मैत्रीण असते

प्रत्येकाची एक वेगळी कहाणी

इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख
प्रत्येकाची एक वेगळी कहाणी
दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार?
प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी!

खूप भेटतात मित्र, सगे, सोयरे
पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके
कधी कधी तर आपले जवळचेच
वाटू लागतात जणू परके!

अशा वेळी कोणी अनोळखीच
जास्त जवळचा वाटू लागतो
आपल्या मनातल्या जखमांवर
जो हळूवार फुंकर घालतो!

वरवर बोलणारे अनेकजण भेटतात
पण असा एखादाच असतो
जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो
तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा जो बघू शकतो

लोकप्रिय देवतांमध्ये गणपतीचं स्थान सगळ्यात वरचं आहे

लोकप्रिय देवतांमध्ये गणपतीचं स्थान सगळ्यात वरचं आहे. विविध रूपांत भक्तांना भुरळ घालणाऱ्या गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाचा घेतलेला वेध.
.........

आज गणपती ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता आहे. गणेशपूजन केल्याशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही; अगदी आधुनिक जीवनसरणी अनुसरणारेदेखील लॅपटॉपवर आधी गणेशप्रतिमा झळकवतात. एवढी गणपती ही देवता आज सर्वसामान्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र काळाचं थोडं उत्खनन केलं, तर या देवतेचा इथपर्यंत झालेला धार्मिक- सांस्कृतिक प्रवास, हा एका मोठ्या सामाजिक अभिसरणाचा भाग असल्याचं उघड होतं. आणि हे अभिसरण समाज बदलतो, तसं दैवतांचं स्वरूप कसं बदलतं, हेच दर्शवणारं आहे. किंबहुना एखाद्या समाजाचा घडता इतिहास हा एखाद्या दैवताचाही इतिहास कसा असतो, ते गणपती या देवतेच्या विकसनप्रक्रियेतून सिध्द होतं.

सर्वसाधारणपणे कुठल्याही दैवताच्या विकसन प्रक्रियेकडे समाजाचं लक्ष नसतं. देवता मग ती शंकर-विष्णू असो, विठोबा असो अथवा खंडोबा. लहानपणापासून थोर मंडळी जे सांगतात, तेच भाविकपणे-भाबडेपणे स्वीकारण्याचं काम समाज करत असतो. परंतु इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, मानववंशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, लोकसाहित्यज्ञ ही मंडळी देव असो वा माणूस वा एखादा समाज, त्याचा सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक असा आडवा-उभा छेद घेत असतात. या विच्छेदनानंतर त्यांच्या हाताला गवसलेलं सत्य काही भन्नाटच असतं. क्वचितकधी सर्वसामान्यांच्या बुद्धीला, भावनेला न झेपणारं. आज सर्व हिंदुधर्मीयांचं महत्त्वाचं दैवत असलेल्या गणपतीची पुरातत्त्वीय, दैवतशास्त्रीय किंवा ऐतिहासिक छाननीही अशीच आहे. एखादं गूढ उकलत जावं, तसा गणपतीचा हा प्रवास आकळत जातो. आणि तो जसा आकळत जातो, गणपतीच्या विविध प्रतिमा या उत्खननातून हाती लागतात. मग कधी तो गणनायक असतो, कधी तंत्रमार्गी असतो, कधी तो विघ्नकर्ता असतो, तर कधी आजचा सुखकर्ता-दु:खहर्ता.

प्रसिद्ध दिवंगत विचारवंत स. रा. गाडगीळ यांनी आपल्या 'लोकायत' पुस्तकात या संपूर्ण विकसन प्रक्रियेचा सविस्तर लेखाजोखा मांडलेला आहे. गणपती या देवतेचा वैदिक काळातील गणदेवता म्हणून सुरू झालेला प्रवास आजच्या 'इष्टदेवता' रूपापर्यंत कसा येऊन पोचला, त्याचा अतिशय मार्मिक वेध गाडगीळांनी घेतला आहे. पण 'गणदेवता' आणि 'इष्टदेवता' या दरम्यान गणपती देवतेचं रुप 'विघ्नहर्ता' ऐवजी 'विघ्नकर्ता' कसं होतं, ते पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरेल. मात्र गणदेवता असो वा इष्टदेवता-विघ्नदेवता... गणपती दैवताच्या एकूणच विकसनाचा माग घेतला की, त्या-त्या काळातील बुद्धिवंत मातीचा गणपती किंवा गणपतीची माती कशी करू शकतात, ते उमगतं. गणपती या देवतेला या संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागलं आहे.

वास्तविक वैदिककाळात गणप्रधान समाज असल्यामुळे आणि वैदिक ऋषी स्वत: त्या गणपप्रधान समाजात राहात असल्यामुळे त्यांनी गणसमाजाचा नायक असलेल्या गणपतीला हरकत घेतलेली नाही. किंबहुना ऋग्वेदात 'गणानाम् त्वां गणपती हवामहे...' अशा शब्दात गणपतीची स्तुती केली आहे. मात्र वेदकालीन गणपती गजशीर्ष नव्हता, असं स.रा.गाडगीळ म्हणतात. 'लोकायत' पुस्तकात ते म्हणतात-'वैदिक ऋषींनी अगदी मुक्तकंठाने गणांचे महात्म्य वर्णिले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून गणपती हा विघ्नकर्ताही नाही आणि विघ्नहर्ताही. किंबहुना त्यांना गजमुखी गणपतीच अज्ञात आहे.'

म्हणजेच आज लोकप्रिय असलेला हस्तिमुख गणपती तेव्हा अस्तित्त्वात नव्हता. तेव्हा गणांचा नायक तो गणपती याच अर्थाने 'गणपती' ही संज्ञा वापरली जायची. गणनायकाला हस्तिमुख मागाहून चिकटलेलं दिसतं. मूळच्या गण 'नायकाला' हत्तीचं तोंड कुठे चिकटलं त्याचा शोध मानववंशशास्त्रज्ञांनी कुललक्षण-कुलचिन्हाचा (टोटेमिझम) सिध्दान्त वापरुन स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मतानुसार, ज्या गणसमाजाचं टोटेम म्हणजे गणचिन्ह हत्ती होता, असा गणसमाज कालांतराने नावारुपाला आला आणि साहजिकच त्या गणसमाजाचं चिन्ह असलेला हत्ती देवतारूप म्हणून समोर आला.

परंतु शेवटी गणसमूह म्हणजे लोकसमूहच. मग लोकसमूह किंवा त्या समूहाच्या देवतेची प्रगती तत्कालीन उच्चवणीर्यांना कशी सहन होणार? त्यातूनच वेदोत्तर काळात लिहिल्या गेलेल्या मानवगृह्यसूत्र, याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती यांसारख्या स्मृतींनी गणपती देवतेची निंदा करायला सुरुवात केली. स्मृतिकारांनी गणपतीला थेट 'विघ्नकर्ता' ठरवून टाकलं. याज्ञवल्क्याने तर, रुद्राने गणपतीची योजनाच संकटांच्या निर्मितीसाठी केली असल्याचं म्हटलं आहे. याज्ञवल्क्य स्मृतीत गणपतीसाठी 'विनायक' हे संबोधन वापरलेलं आढळतं. आज हे संबोधन चांगल्या अर्थाने वापरलं जातं. परंतु याज्ञवल्क्य स्मृतीत मात्र ते वाईट अर्थानेच वापरलेलं होतं आणि त्यासाठी याज्ञवल्क्याने 'विनायक: कर्मविघ्नसिध्यर्थ विनियोजित:' असं म्हटलं आहे. याच पद्धतीने मनुस्मृतीनेही गणपतीची निंदा केलेली आहे. आणि या निंदेचं कारण म्हणजे तेव्हा 'लोकायत' म्हणजे तत्कालीन बहुजन समाजात गणपती देवतेला प्राप्त झालेलं वलय.

मात्र स्मृतिकारांनी गणपतीला 'विघ्नकर्ता' ठरवलं, तरी इसवीसनोत्तर पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात गणपती या देवतेचा पुन्हा उत्कर्षकाळ सुरू झाला. कारण गुप्तकाळात सर्व पुराणग्रंथांना नवा उजाळा मिळाल्याचं स.रा. गाडगीळ म्हणतात. या काळात गणपती या देवतेला एकदम महत्त्व प्रापप्त झालेलं दिसतं. एवढंच नव्हे, तर स्कंदपुराण, गणेशपुराण, गणेश उपनिषद, असे गणपतीची स्तुती करणारे ग्रंथ निर्माण झाले. याचदरम्यान गणपतीच्या जन्मासंबंधी-निर्मितीसंबंधीच्या अनेक पुराणकथा निर्माण झाल्या.

गणपतीच्या या वेगवेगळ्या अवस्थांतरांची स.रा. गाडगीळ तीन टप्प्यात विभागणी करतात. पहिला टप्पा वैदकालीन गणगौरव रूपातील गणपतीचा, दुसरा टप्पा स्मृतिकालीन गणपतीचा, तर तिसरा टप्पा नव्याने महत्ता प्राप्त झालेल्या गणपतीचा. तसंच गणेशदेवतेचा हा प्रवास म्हणजे गणसमाजाच्या विकासक्रमाचे तीन टप्पे असल्याचंही सांगतात.

गणपतीची ही तीन अवस्थांतरं एकूणच उच्च वणिर्यांच्या मानसिकेतवर प्रकाश टाकणारी आहेत. म्हणजे सर्वप्रथम बहुजनसमाजातील एखादा नावारूपाला येत असेल, तर त्याची निंदा करायची. त्या निंदेचा काही परिणाम झाला नाही, तर त्याचा गुणगौरव करुन त्याला आपल्या टोळक्यात घ्यायचं आणि संपवून टाकायचं. म्हणूनच मूळचा गणसमाजातील लोकदेवतास्वरूप असलेला गणपती आता एकप्रकारे उच्चवणीर्य वेदकालीन देव झाला आहे आणि सर्व कला-विद्यांच्या महत्तम स्थानी येऊन बसला आहे.

परंतु यापलीकडेही गणेश या देवतेची पुरातत्त्वज्ञ अजून एक विकासावस्था दाखवतात. कारण पुराणकथा या पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टिकोनातून भाकडकथाच. त्यांच्या मते पुराणकथांनी एखाद्या देवतेची प्रभावळ निर्माण करता येते, तिची विकासावस्था दाखवता येत नाही. याच दृष्टिकोनातून प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांनी गणपती या देवतेची पुरातत्त्वीय मांडणी केली आहे. पाचव्या शतकाच्या आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात गणेशोपासना नव्हती, असं एक मत आहे. पण ढवळीकर यांनी ते खोडून काढलंय. ते म्हणतात-,'गुप्तकाळापूर्वीचं प्रसिद्ध राजकुल म्हणजे कुशाणांचं. त्यांचं राज्य अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं होतं. पुरातत्त्वीय उत्खननात कुषाणकालीन आणि कुषाणपूर्व असे दोन्ही प्रकारचे गणपतीमूर्तीचे पुरावे सापडलेले आहेत. याचा अर्थ आर्यांच्या एखाद्या प्रबळ जमातीचं हे दैवत वायव्येकडून प्रथम उत्तर भारतात आणि नंतर उर्वरित भारतात संक्रमित होत गेलेलं असावं.'

चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याच्या ग्रंथाचीही ढवळीकर दाखला देतात आणि म्हणतात की, ह्यूएन त्संग काही महिने अफगाणिस्तानमधील तत्कालीन कपिशा नगरीत राहिला होता. त्याने लिहिलेल्या निरीक्षणांत, हत्तीच्या स्वरूपात नांदणारा 'पिलुसार' नावाचा देव कपिशावासीयांचा देव असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

गणेश या देवतेचा असा हा सांस्कृतिक प्रवास एकूणच देवतांच्या स्वरूपावर लखलखीत प्रकाश टाकणारा आहे

एका ओळीत तुझ्यासाठी काय काय लिहू......

प्रेमाचे श्राद्ध सखे
भरले आठवणींने ते स्मशान
पत्ता स्मशानाचा सखे
नेहमीचे आपले ते ठिकाण...



कधी कुणावर आपण
किती ठेवावा विश्वास...
कुणी मागे पर्यंत.....
निघून जाईल हा श्वास




तू वेडा आहेस
असे तिचे डोळे म्हणाले होते मज शहाण्यास काय ठाऊक
तिने भविष्य सांगितले होते..



तुझ्या त्या शब्दाने
मन माझ हेलावल
त्या अंतरीच्या जखमेन
भरून न यायचं ठरवलं



एका ओळीत तुझ्यासाठी काय काय लिहू......
तुझे रूप मांडू कि तुझे अंतर मन...
शब्दांनाही त्यांची एक आहे सीमा..
त्यात सामावणार नाही असे आहेत ग तुझे गुण..

मैत्री आहे सुखद प्रवास,

मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
हे बंधन देते मृत हृदयाला हि स्पंदन..

मैत्री आहे सुखद प्रवास,
इथे न धोक्याचे वळण न ब्रेकप चा त्रास.....

मैत्री आहे गुलाबचे फूल ,
काटे असतात थोडे पण नेहमीच असते कुल.......

जिथे प्रेम इथे मैत्री,
पण तुटणार नाही कधी अशी फक्त मैत्री मधेच खात्री....

कदर मौल्यवान सोन्याची,

कदर मौल्यवान सोन्याची,
कदर चकाकणाऱ्या हिऱ्याची,
कदर कागदाच्या नोटांची,
कदर सुंदर मुखड्याची,
कदर रक्ताच्या नात्यांची,
कदर स्वतःच्या भावनांची,
.................मग का नाही कदर जगात दुसऱ्याच्या
.................आपल्यासाठीच्या जीवापाड प्रेमाची..??

अश्रू आणि मन

अश्रू आणि मन यांचे
जुळ्याचे नाते असते ,
मनाला झालेली जखम
अश्रू बनून वाहत असते .....

खरतर डोळ्यांनीचं केली होती बेईमानी
तुला बघताचं ढळला होता त्यांचा ईमान,
पण आज तेचं भोगताहेत त्यांचं नशीब
अश्रू गाळून आज होतोय प्रेमाचा सन्मान..!!




अश्रू आणि मन यांचे
जुळ्याचे नाते असते ,
मनाला झालेली जखम
अश्रू बनून वाहत असते .....

अचानक कुणीतरी आयुष्यात येत

कसं असत ना प्रेम
आधी पडायचं नसतं
अन पडल कि फक्त रडायचं असतं......

अचानक कुणीतरी आयुष्यात येत
अन म्हणत मी तुज्यावर खूप करतो
रात्र रात्र जागतो तुज्या आठवणीत
आणि आसवांना तर बांधच नसतो...

मग चालू होतात गप्पा दोघान मध्ये
तू काय करतोस.....मी काय करते....
हळू हळू मैत्री हि होते.....
मग मैत्री म्हणून एका सकाळी
कॉफी साठी भेट हि ठरते...

पहिली भेट दोघानाही तेवढीच उत्सुकता
पहिल्यांदाच भेटतो आहोत न बघता......
हजार प्रश्न मनात डोकावतात,
पाहिलं कोण बोलणार हा प्रश्न ?

तो सराईत पणे विषय हाताळतो
पाहिलं वाक्य तू संदीप खरेंची गाणी ऐकली आहेत
ती मानेनेच नकार देते......
तो तिला संदीप खरेंची साँग देतो.....

लागते अनाम ओढ श्वासाना.....
येत असे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना

ती भेट संदीप खरेंच्या गाण्यावर
संपते कि चालू होते ???

तीही ते गाणे रोज ऐकते......त्यातील तीच आवडत कडव

मी असा जरी नीजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना...

तिला त्याची खूप खूप आठवण येते
तिचा त्याला massage जातो

I miss u .........माहित नाही का?

ओठावरचा तील तुझ्या..

ओठावरचा तील तुझ्या..
मोहून घेतो मजला...
स्पर्श करण्यास त्यास..
माझा ओठ हि आतुरलेला..

तू मुसकुरा देती है ,तो दर्द भी मुसकुरा देता है

तू मुसकुरा देती है ,तो दर्द भी मुसकुरा देता है
तेरी यादो का कारवा,मुझे फिर जीने की सजा देता है

मै जो पुछता रहता हु तुम्हे मेरी ही तकदीर से कभी
छलकते आसुवोसे आखोका मैखाना सजा देता है

वो ग़ज़ल छेड़ देता हु, वो शेर पढ़ लेता हु मैफिलोमे
दिल-ए-तन्हाई में तेरा लिखा हर एक अल्फाज मजा देता है

शिकायते कई थी... कई बार ढूंडना भी चाहा मंजिल को
ठिकाना बदलना खेल तेरा ..वो है की झूठा हि पता देता है

फिर हसी लिए चहरे पे गुजरता हु उन भीड़ भरी गलियों से
"nileश" गम को तराशने वाला देख तुझे फिर वही दुवा देता है

जवळ तू आलीस कि वेळ ती स्तब्ध होई....

दिलखेच अदा तिची, सैरभैर माझी स्थिती,
एकदा तरी तू पटावीस, धडपड माझी सततची...
तुझ्या नयनीचे चांदणे, त्या चांदण्यात न्हाहून मी,
तयार असे हा दिवाना तुझा..---सप्तपदिंसाठी...||१||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा...||धृ||
दूर तू गेलीस कि इथे स्पंदने माझी थांबती..
जवळ तू आलीस कि वेळ ती स्तब्ध होई....
अत्तरे अनेक जरी, तुझा गंध फक्त- कसली मग ती कस्तुरी...
का असे अवघड प्रेम हे, उत्तरे त्यांची मी शोधिसी..||२||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा... ||धृ||
दिले हे तुला जीवन माझे, अर्पिले सगळे जे आहे थोडे,
बांधुनी आपले घट्ट नाते, दे मला तुझे प्रेम दे....
ये ना सखे, मज आलिंगन दे,
तुझे सौंदर्य पिण्याकरिता जो चातक मी- मला एक जरी तो थेंब दे...||३||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा... ||धृ

दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

तुझी भेट व्हावी तरी न थेट व्हावी
दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

बागेत उभा मी तू पुन्हा थोडी लेट यावी
मग पापणी तुझी उगाच वेट व्हावी

कारणे अशीही दाखविता तू मंजुळा
तापलेली जिव्हा माझी चेक मेट व्हावी

गुलाब दमलेला मग तुझ्या पुढ्यात ठेवावा
वाया गेलेली वेळ ती पुन्हा सेट व्हावी

हळुवार स्पंदने ती बोईंग किवा जेट व्हावी
तुझी भेट व्हावी अशी तुझ्या माझ्यात ग्रेट व्हावी

काव्याचा सागर, शब्दांचा आहेर तुला अर्पण,

घालमेल जीवाची संपविण्या सखे
परतुनी येईल मी अनंताचा प्रवासी,
नजरेत तुझ्या आत्मीयतेचं प्रदर्शन
मृत्यूलाही सहजी कोड पडेल साहसी..!!


चारोळ्या माझ्या पण त्यांत छबी तुझीचं
काव्याचा सागर, शब्दांचा आहेर तुला अर्पण,
धन्यता आयुष्याला त्या चार ओळींच्या
स्वखुशीने तुझ्या सौंदर्याला त्याचं समर्पण..!!

प्रेम करणं कुठे जमलं मला. .

प्रेम करणं कुठे जमलं मला. .

सांगुच नाही शकलो कधी मनातलं तिला

पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली. .

"कधी कुणावर प्रेमं नको करुस" हे मात्र सांगुन गेली.....

पाऊल तुझं भिडलं आपसूक सखे

डोळ्यांनी का चहाडी करावी सख्या तुझ्या मनाकडे? ,
मग त्यानेही मला बोलवावं ,
अस केंव्हाही तुझ्याकडे ?



पाऊल तुझं भिडलं आपसूक सखे
मनाच्या उंबरठ्यावर अडखळलं,
धीर देता प्रेमाचा ते आपणहून
अंतरंगापर्यंत बघ कसं हळहळलं..!!



तू मला भेटायला बोलावलंस ,
आणि मी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं,
पण कस काय कोण जाणे,
पण ते तुझ्या मनाच्या दारात पडलं !


चहाडी प्रीतीची सखे
अंगाअंगातून दर्शते,
भरली नजर तुझी
आता मनोमनी स्पर्शते..!!

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस.
अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस
निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!

.......ती एक वेडी होती.

दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ...
शणात रुसयाचे अन् शणात हसायचे ....
एकमेकाशी बोलायाचे नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे ....
ती त्याच्यात गुंतलेली अन तो अनेकात् गुंतलेला ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......

ती खुदकन हसे अन हलूवार डोळे त्याच्यासाठी ओलेही करे .....
पापण्यांच्या आडून चोरून ती बघे अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ......
ती त्याचाच तासनतास विचार करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई ....
तिच्यासाठी तो बराच कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास होई ....
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......

ती शांत सागर लाट अन तो एक उफलालेला सागर ....
ती एकनिष्ट पतंग अन तो एक बेफाम भ्रमर ....
ती स्वतः अधि त्याचा विचार करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा ....
ती त्याच्याकडे कधीच अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही करणार ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती .....
.
.
.
.

मित्रहो.........

आता त्याला सर्व काही कळतंय.... सर्व काही बदललय...
पण वेळ निघून गेलीये... दोघांचे रस्ते हि बदललेत
अजूनही दोघांच्या मनात तीच ओढ आहे....जी कधी काळी फक्त तिच्याच मनात होती...

आता ती त्याच्या मार्गाकडे वळू नाही शकत आहे... कसा होणार पुढे तीच आणि त्याच...???

तू कितीही रुसलीस तरी...

तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटला.......तु जरि, आहेत अडखडे.....





तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटला.......तु जरि, आहेत अडखडे.........




सोसलेल्या वेदनांना ह्रदयी मी बाळगले
वेदना त्या शमविण्या फ़ुंकर तू होऊन ये...........



तू कितीही रुसलीस तरी...
सदा माझ्या जवळ राहशील...
जेव्हा जेव्हा येतील अश्रू डोळ्यात तुझ्या..
त्या प्रत्येक अश्रू मध्ये मलाच पाहशील...

एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,

आठवणीत तुझ्या मी
अशी एक सिगारेट जाळली
निर्दयी धुराने
तुझीच प्रतिमा साकारली

तिच्या नादी लागून
बारची वाट धरली
गळ्यातल सूत्र पाहून
एक पेगची संख्या वाढवली

एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला......

शपथ माझ्या रक्ताची तुला येऊ नकोस माघारी

!माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते

कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!



शपथ माझ्या रक्ताची तुला येऊ नकोस माघारी
नाही दिसणार तुला मी आता कधीचं ह्या संसारी,
पुसट आशा तुझ्या परतण्याच्या आता संपल्या
अस्तित्वाची ज्योत आता माझीही न टिकणारी..!!



सुटता सुटेना हे बंध
आडकून ठेवी हा गंध
जेह्वा हि येई हि आठवण
क्षणातच वाढी हि स्पंदन

मि अजुनही तोच आहे..

मि अजुनही तोच आहे..
पहिल्या नजरेतच तुला तुझ्या पासुन चोरणारा..
तुझ्या ओठावरच्या प्रत्येक शब्दात बोलणारा..
तुझ्या डोळ्यातल्या अश्रुंसोबत वाहणारा..
अन तुझ्या हृद्यात पोकळी करून निघुन जाणारा.

काही गणित चुकतात..

काही गणित चुकतात..
म्हणून त्यांना अर्ध्यावर सोडू नये..
मनात वसलेल्या नात्याला.
असे अर्ध्यावर मोडू नये..

शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिभेला लागतो

शब्दही आपलेच असतात
भावनाही आपल्याच असतात
फक्त त्या एकमेकांत गुंतवून आपण त्या जपायच्या असतात......



शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिभेला लागतो
मन स्वतःचे असते झुरावेमात्र इतरासाठी लागते,
ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात,
हीचती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणतात...

लग्नात मान्ड्व कशासाठी???

*
1*)लग्नात मान्ड्व कशासाठी???
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मान्ड्वासारखचं मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!
*

* 2)विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!
*

* 3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
= माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!
*

* 4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!
*

* 5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या-माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे
सांगण्यासाठी !!!
*

* 6)लग्नात सप्तपदी घालावी,हे कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे
सांगण्यासाठी !!!
*
* 7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी

जीवन आहे ते तर जगायलाच पाहिजे

जीवन आहे ते तर जगायलाच पाहिजे
देवाने आयुष दिले आहे तेव्हा हसत मारायलाच पाहिजे
नुसते रडण्यात काय अर्थ आहे .. जे पण आयुष्यात आहे त्यात समाधान
मिळवलेच पाहिजे...........

तुझी भेट व्हावीएकदातरी

तुला भेटण्याचीओढ ना खरी
तुझी भेट व्हावीएकदातरी

तरी राहिले राखेतमी तुझ्या
मला जाळले मेल्यावरीजरी

म्हणू सोय किंवाम्हणू वावडे
नको आपले नातेतुझ्यापरी

तसे काय बाकी व्हायचेम्हणा
फुलांच्या इजांनीया मनावरी

किती अंतरीची अंतरेअशी
जशी खोल अश्रुंनादुःख दरी

कधी ओठ तू होशीलरे अता
नको सूर हे आणीकबासरी

जरा ऐक माझे एकएवढे
"जिथे पायआहे तीच पायरी "

तुझे आयुष्यात येणे भासते नक्षत्रांचे देणे

तुझे आयुष्यात येणे
भासते नक्षत्रांचे देणे
चंद्रासोबत तारकांनीही
ऐकले माझे गाऱ्हाणे..!!

तुझे आयुष्यात येणे
इच्छित प्राप्त होणे
उभ्या जन्माचं स्वप्न
हट्टाने फळाला येणे..!!

तुझे आयुष्यात येणे
असेल पूर्वजन्म पुण्याईने
तुझ्या भावूक नजरेतून
जन्मोजन्मीचे संकेत मिळणे..!!

तुझे आयुष्यात येणे
मनोकामना पूर्ण होणे
दृढ इच्छा ज्याची
तोच वर प्राप्त होणे..!!

तुझे आयुष्यात येणे
वयाच्या इशाऱ्याने
तरुणपनाच्या उंबरठ्यावर
तुझी गरज भासणे..!!

तुझे आयुष्यात येणे
कळीचे फूल होणे
मिटल्या सुगंधाला
मुक्त ओंजळ लाभणे..!!

तुझे आयुष्यात येणे
माझ्या बाप्पाच्या कृपेने
पायावर वाहिलेल्या नवसाचे
कृपादृष्टीत पारणे फिटणे..!!

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय ?
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिला पाहण्यासाठी दिवसभर तळमळायचे
ती जवळ आली कि दूरवर पळायचे
पळकुटेपणाला या काय प्रेमाचे म्हणतात पाय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिने काही दिले तर(?) सर्व काही बरे असते
नाही दिले तर मात्र त्या प्रेमाचे काही खरे नसते ?
प्रेमभांगाशिवाय मग त्यांच्या समोर नसतो पर्याय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

मिलानाशिवाय यांना दुसर काही दिसत नाही
प्रेमामध्ये यांच्या यांच्याशिवाय कोणी भिजत नाही
दोन मन जुळण्यासाठी मग सर्व जग विसरण्याचा पर्याय?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेमाला विरोध नाही माझा , नाही त्या भावनेला विरोध आहे
पण सर्व राहावे सुखी यासाठीच तर नेहमी त्या प्रेमाचा शोध आहे
पण आजकाल भरकटली प्रेमवाट आणि भरकटले पाय ?......
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेम म्हणजे कसे कृष्ण राधेसारखे असावं
त्याच्यामध्ये नेहमी त्याग आणि बलिदान दिसावं
आताच्या प्रेमामध्ये या दोघांची जणूकाही गरजच नाय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

ज्याला समजला अर्थ तो नेहमी सुखात जगेल
देवाजवळ नेहमी दुसरयाच सुख मागेल
ज्याला कळला अर्थ त्याचे आपोआप टळतील सर्व अपाय

याच्या पेक्षा प्रेमाचा दुसरा अर्थ तरी काय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

मी तर आहे मदमस्त वारा,

मी तर आहे मदमस्त वारा,
झुळूक तुही होशील का...?
करूया स्पर्धा नभांशीच या,
माझ्यासवे येशील का...?
बनुनी ऋतू सुखवू जनांना,
गंध प्रितीचा देशील का...?
बहरून टाकू समस्त बागा,
हात हाती तू घेशील का...?
नेसून साजरा लाल जोडा,
हिरवा शालू लेशील का...?
गाऊनी गाणे धुंद मनाचे,
स्वर आकाशी नेशील का...?
मी तर आहे मदमस्त वारा,
झुळूक तुही होशील का...?

प्रेम म्हणजे ? समजली तर भावना …..

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना …..
पाहिले तर नाते …
म्हणले तर शब्द …
वाटली तर मैत्री ....
...घेतली तर काळजी....
तुटले तर नशीब ….
पण मिळाले तर स्वर्ग....

चारोळ्या माझ्या पण त्यांत छबी तुझीचं

गडबडलं धडधडलं हृदय हे माझं
न कळली ताकत त्या दर्शनाची,
तगमग लगबग झाली मनाची
शीतोष्ण लाहीलाही सर्वांगाची..!!



मजला कसला हक्क करण्याचा
तारीफ तुझ्या मोहक रूपाचा
शब्दच वेडे माझे सख्ये
तोडिसी बांध मनी भावनाचा



जाताना काल ती जराशी अडखळली
मागे वळून हळूचं गालात हसली,
वेडाबाईचा माझ्या गोंधळ किती होतो
परत गुपचूप शेजारी येऊन बसली..!!



चारोळ्या माझ्या पण त्यांत छबी तुझीचं
काव्याचा सागर, शब्दांचा आहेर तुला अर्पण,
धन्यता आयुष्याला त्या चार ओळींच्या
स्वखुशीने तुझ्या सौंदर्याला त्याचं समर्पण..!!

ओळख नसते पाळख नसते

"हरविलेले काव्य शब्द
अचानक कधीतरी सापडतात,
अपलेच शब्द वेचताना
नकळत पापण्या भिजवतात.. "



तुला कळते ना ग माझी सवय..
मग तरी तू उगाच रुसतेस..
मी तुला मानावावे म्हणून...
उगाच हट्ट करून बसतेस..



ओळख नसते पाळख नसते असे अपणास कोणीतरी भेटते,
मग एकमेकांची ओळख पटते,
त्याची आपली गट्टी जमते,
एकमेकांच्या मनातील भाषा कळते,
इकडे तिकडे मन वळते,
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे अवघड असते,
दूर राहणे असह्य होते, का असे हे नाते असते,
अशीच ही न तुटणारी जन्मोजन्मीची मैञी असते

मनात तुझ्या राग असला तरी...

पुन्हा काय शोधिसी मना
आठवणींच्या या अस्ती मध्ये
का पुन्हा जन्म घेतोस
प्रेतांच्या या वस्ती मध्ये



मनात तुझ्या राग असला तरी...
तू माझाच विचार करत आसतोस
मी तुझ्या पासून दूर असलो तरी..
तू सतत माझ्या सोबत आसतोस

Friday, September 16, 2011

जगात जर खरंच प्रेम नसतं

जगात जर खरंच प्रेम नसतं
तर अख्खं जग मैत्रिमय असतं,
पण प्रेमाने तोंड पोळल्यावर मात्र
मन मैत्रीच्याचं शीतोष्ण धारेत रमत..!!

ती येणार होती, नाही आली......!

ती येणार होती, नाही आली......!
पण.............!
तिची आठवण मात्र येऊन गेली...!
शेवटी तिला भेटण्याची इच्छा मनीच राहून गेली...!
तरी पण ......!
भास झाला मनाला ..!
वाटल कि, ती आली...!
पण.............!
दार उघडून पाहतो तर काय....
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!

*काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?

प्रेम केलं नाही?
*काय म्हणालात तुम्ही
कधीच प्रेम केलं नाही?

अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?
ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!

कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?
फार काही बिघडल नाही!

केल्या नाही चार कविता!
मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही?

"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मला एकदा थेंब व्हायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
अन पाण्यात मिसळून जायचयं...
पाण्यात एकरूप होऊन..
स्वत:ला पाहायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
एकदा पावसा सोबत बरसायचयं..
पावसा सोबत बरसून..
श्रुष्टीला फूलवायचयं...

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या डोळ्यांतून वाहायचयं..
तुझ्या मनातील दु:खांना..
आपलेसे करुन घ्यायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या गालावरुन ओरघळायचयं..
तुझ्या ओठावर येऊन मग..
तिथेच विरुन जायचयं..

मैत्रीत असते सर्व काही माफ..

मैत्रीत असते सर्व काही माफ..

मैत्रीत असते सर्व काही माफ..
मैत्री तुझ्या माझ्या मनाचे वजनदार माप..
मला जड जाताच तू त्याला सावरावे..
तुझे सारे दु:ख माझ्या झोळीत यावे..

प्रत्येक हसणारया चेहरा..
विदुषकाचा असतो..
जो मनात दु:खांचा डोंगर रचून..
दुसरयांना हसवत असतो

तुझी माझी मैत्री..
आपल्या मनात रुजलेली..
ऊन पावसा पासून..
आपण अलगद जपलेली..

सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची

सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेल

जाईल उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल
नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल

कुणीतरी आठवण काढतंय!!

कुणीतरी आठवण काढतंय!!

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेव्हा रात्र असते अमावसेची

च्नद्राला हि जाणीव आहे त्या
चांदण्यांच्या अस्तित्वाची
म्हणूनच तर तो बिनधास्त असतो
जेव्हा रात्र असते अमावसेची

माझी ही एक मैत्रीण होती

माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हा ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..
मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..
बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने बागडायची…

तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…

अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..

एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…

तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..

तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,

पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

Tuesday, September 13, 2011

आज काय हा वारा कानी सांगून गेला,

अमावस्येच्या रात्री ती सये
चंद्र पाहण्याचा हट्ट करते
माहित आहे त्या निमित्ताने
क्षणभर माझा हात घट्ट धरते ....................






आज काय हा वारा कानी सांगून गेला,
शांत चित्त मान माझे, हर्ष उल्लीत करून गेला,
आनंद ओसंडून, नेत्र पाझरून गेला,
चेहऱ्या वर आनंद तर, डोळांन मध्ये अश्रू साठून गेला,
जे तर न छेडायचे, तेच तो छेडून गेला,
गुंफून प्रेम माळा, मानस मान भिडउन गेला,
आणी ज्या पासून आज वर जपले तेच वेड मज लाऊन गेला.

आभाळाला एकदा निवडायला घेतलं सखीने

होतास तू पावसा बरोबर , म्हणून मी धाडस केल.

धरतीच्या अंगावर कलाकुसर, करण्याच साहस केल.

कुंचला घेऊन बघ पिकाला,मी मालिश केल.

कस त्यातून बघ ,टपोर मोती निपजल.






आभाळाला एकदा निवडायला घेतलं सखीने
पाखडून निघालेल्या चांदण्या फेकल्या तिने खाली,
थोड्या ताराकांसोबत चंद्र होता उरला सुपात
साजन वरचढ म्हणून मग चंद्रही केराच्या हवाली..!!

प्रेम म्हणजे ? समजली तर भावना …..

प्रत्येक जन जगतोय,
जीवनाच्या आशेने..
पळत रहा फ़क्त,
मरणाच्या दिशेने...









प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना …..
पाहिले तर नाते …
म्हणले तर शब्द …
वाटली तर मैत्री ....
...घेतली तर काळजी....
तुटले तर नशीब ….
पण मिळाले तर स्वर्ग....

कमळ पञा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत

कमळ पञा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत... निसटणाऱ्‍या क्षणांना कधी जवळ करायच नसत... माणसाच आयुष्य हे असच असत, बाकी काही हरवल तरी त्यापेक्षा जास्त उरलेल असत...

मनामनात उसळू दे आपल्या ,क्रांतीची ही लाट

मनामनात उसळू दे आपल्या ,क्रांतीची ही लाट
घालून हातात हात ,करूया दुर्गुणावर मात
मीठ खाऊनि मायभूचे
का विकती हे ईमान?
कितीही खाल्लं-पिलं तरी
नाही भागत यांची तहान .
एक असता आपण सारे ,का साहू सारे हे मुकाट?
घालून हातात हात...........................................

परकीयांना हाकून दिली
आपण यांच्या हाती कमान .
पण विसरून सारे,होऊन राहिले
हे पैशाचे रे गुलाम .
एकदिलाने दाखवू आपण, यांना आपला स्वाभिमान .
घालून हातात हात ..............................................

अंदाज नाही यांना आपला
काय करतो राष्ट्राभिमान ?
चिरडून टाकू गुर्मी यांची
घेऊन तळहाती प्राण.
एक आहोत,एक होऊनी ,राखू देशाची हो शान ....
घालून हातात हात, करू दुर्गुणावर मात....

सूर्याला लपवून पाठीशी

"काळा ढग""

आकाशात काळे पांढरे ढग रंगवून पट खेळतोयस तू

सूर्याला लपवून पाठीशी
माझ्या अंगणात काळोख पसरवून
आनंदी झाला असंशील तू,
कि उजेडाला मात दिली मी
वेडा आहेस.............
मी काजवे घेवून चालतोय ह्या अंधारात
आणि मार्ग सुद्धा मिळालाय मला..

तू विजांचा धाक दाखवून
मुसळधार बरसलास माझ्यावर
बघ ...मी इवल्याश्या ओंजळीत
झेललंय तुला .......

तू तुटून पडलास कधी माझ्यावर
कधी वादळे पाठवली उजाडण्या मला
पण मी मात्र वैर कधी केले नाही तुझ्याशी
पडलेले घर बांधत राहलो पुन्हा पुन्हा

तुझ्या सरींच्या त्या लाटांनी
उध्वस्त करू पहाले तू बांध माझ्या मनाचे
आणि माझ्या एका आसवाने ढळता ढळता
तुझा चंद्रच विरघळून टाकला

आनंदी होत असशील जेव्हा
या तुझ्या पटाच्या खेळात "जीवन" हरत असेल तेव्हा
पण ध्यानात असु दे तुझ्या
हे शरीर वाहून नेत आहेस तू
माझा आत्मा अजूनही खंबीर आहे तिथेच
तुझ्याशी याच पटावर ..............खेळण्यासाठी
बघ फिरवून एकदा त्या पटाला
विजय माझाच असेन......................

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....
नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...
पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
...कुणीतरी बोलावताय म्हणून भेट लौकर सुटेल...
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...
आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरातील अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!

एकांतात सोबत देतात हे शब्द..

एकांतात सोबत देतात हे शब्द..
दु:खावर पांघरून घालतात हे शब्द..
दोन जिवांना एकत्र आणतात हे शब्द..
अन दोघांना विलग करणारे देखिल हे शब्दच...

बाकी शून्यातल्या दुखाला, मोजणे न काही

मागणे न काही ................

भरल्या झोळ्या सुखाच्या मागणे न काही
बाकी शून्यातल्या दुखाला, मोजणे न काही

शब्द निर्मळ होऊनी वाहतो पाना पानातुनी
तू वाचले ते कधीतरी, आता बोलणे न काही

डोळ्यांनी टिपला शब्द,ओठात विसावला काही
स्तब्ध गोठला पहा तिथे, पुढे चालणे न काही

हसणे-रडणे मनाचे झाले लेखणीत कैद काही
अश्रुस दिली दाद त्यांनी, खोटे सांगणे न काही

धाग्यात ओळीच्या मी शब्दास माळले काही
मुक्त विचारात रमलो,मज आज सुचणे न काही

तो कालचा म्हणोनी जुने नाव मिळाले काही
नव्याचा ठाव कळेना,वाटा माझ्यात शोधणे न काही

का मांडले जीवना तुला निर्जीव कागदावर काही
शाईस झीज नशिबी,अमर ते जगणे न काही

प्रस्तावना जीवाची मी शेवटास मांडली काही
अंती मूल्य हे मिळाले कि लेखणीस धार नाही

शिक्षेस पात्र ठरला लिहिता चुकला कधी कुठे काही
मज निशब्द केले त्यांनी आता भोगणे न काही

सरळ चालता ओळीत त्या, तू कधी शोभला न काही
तुज वाटे सारे सारखे, ऐकले त्यांचे सांगणे न काही

का चांदण्यास तुटावे लागते सये

का चांदण्यास तुटावे लागते सये
इच्छा कुणाची तरी पूर्ण करायला
स्वार्थ का नसतो त्यासं जगण्याचा
का लगेच तयार तो नभ सोडायला ?

गावातल्या दगडी देवळाच्या पायरीवर

गावातल्या दगडी देवळाच्या पायरीवर
शांत पणे बसावे
दिवस भर उन्हाने तापलेल्या
दगडांची उब घेत बसावे...
कोणी पाणी शिंपडताच एक सुहास दरवळतो
उदबत्तीचा सुघंदं मोहक वाटतो,
अन् विझलेला दिवा कुणीतरी पेटवते
व मनात शांतीचे वारे भूरभुरते...
हळू हळू संधिप्रकाश रेंगाळतो
अंधारात विलीन होऊ लागतो...
दिव्याचा प्रकाश मूर्तीवर पडतो
गोजिरवाणी मूर्ती हसते
अन् एकरूप होऊ लागतो
आपला आत्मा त्या हसण्यात...
बस हेच ते जे हवे हवे से असते
जिथे काही हि बोलायचे नसते
अस्तित्व आपले विसरायचे असते
अन् फक्त शांततेत विलीन व्हायचे असते....

आज परत एकदा, मी.. खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...

आज परत एकदा, मी..
खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...
हरवलो होतो भूतकाळात.
सगळ कसं डोळ्यांसमोरून चाललं होतं..
जणू काही आत्ताच घडतंय !!
जाणवले तुझे स्पर्श,
डबडबलेली नजर तुझी आठवली
अन् टचकन माझ्याच डोळ्यातून थेंब ओघळला...
टिपला मी तो, वेचलेल्या क्षणांसारखा...
कोरडे हसू येते मला, कि किती दिवस झाले कोण जाणे.... मान खाली घालून जगण्याला..!!
रात्र झाली ना कि वेड्यासारखे होते बघ
गलबलते, चढणाऱ्या रात्री बरोबर...
चांगले क्षण आठवतात,
जे आता गळून पडले आहेत सुकलेल्या पानांसारखे..
सगळं थांबलं आहे आज...,
जेव्हा तुझ्या आठवणी सुटल्या, माझ्या कुठल्यातरी मनातल्या खोल वाटेवरून.
जी वाट हरवली होती, काळाच्या जंगलात..
मुरली होती पावसाच्या पाण्यासारखी...
जिथे दोन्ही बाजूंना तुझी गर्द राई होती..
आणि तुझ्या प्रेमाच्या हिरवळीचा गारवा..
जो आत्ताच्या बोचणाऱ्या एकाकी गरव्या सारखा नव्हता कधीच... नुसता कोरडा हा गारवा ग..!!
आज परत एकदा
तू दाटून आलीस ढगांसारखी
बरसुनी डोळ्यांतून.... बेधुंद होऊन..
सगळं सरलं, नुसत्या जखमा उरल्या मागे..
फुंकर घालण्यासाठी....
आज परत एकदा..
परत एकदा......!!!

ती रात्र, शांत, एकाकी, निर्मनुष्य, कानात भुरभुरणारा वारा आणि रातकिड्यांची किरकिर उधाण आलेले आठवणींना अन् नजर शून्य... दुःख नाही... फक्त शांतता, संवेदन

ती रात्र, शांत, एकाकी, निर्मनुष्य,
कानात भुरभुरणारा वारा आणि रातकिड्यांची किरकिर
उधाण आलेले आठवणींना अन् नजर शून्य...
दुःख नाही...
फक्त शांतता,
संवेदना थोड्या बोथट झालेल्या
आणि जाणिवांची पोकाळता...
बाहेर पडल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर
पाऊले दिशाहीन वळतात,
अंधारातील घरट्यांचे
दरवाजेही बंद असतात...
प्रत्येक जागेच्या आठवणीत
हळू हळू विरघळतो मी अंधारात,
मागे वळून पाहताच
उमटलेल्या पाऊलांचे फक्त ठसे दिसतात....
रस्ता संपतो
अन् रात्र झोपी जाते,
क्षितिजावर उगवलेली पहाट
नवीच कहाणी सांगत असते....
कानात भुरभुरणारा वारा आणि रातकिड्यांची किरकिर
उधाण आलेले आठवणींना अन् नजर शून्य...
दुःख नाही...
फक्त शांतता,
संवेदना थोड्या बोथट झालेल्या
आणि जाणिवांची पोकाळता...
बाहेर पडल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर
पाऊले दिशाहीन वळतात,
अंधारातील घरट्यांचे
दरवाजेही बंद असतात...
प्रत्येक जागेच्या आठवणीत
हळू हळू विरघळतो मी अंधारात,
मागे वळून पाहताच
उमटलेल्या पाऊलांचे फक्त ठसे दिसतात....
रस्ता संपतो
अन् रात्र झोपी जाते,
क्षितिजावर उगवलेली पहाट
नवीच कहाणी सांगत असते....

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं, असं प्रेम करावं
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं.........

विचारले मी सगळ्यांना प्रेम हे नक्की काय असतं ?

विचारले मी सगळ्यांना
प्रेम हे नक्की काय असतं ?

कुणी म्हणे प्रेम करावे लागते.
कुणी म्हणे प्रेम आपोआप होते.
...कुणी म्हणे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं सेम असतं.........!

कुणी म्हणे आग का दरिया है
कुणी म्हणे चाहत का नशा है
कुणी म्हणे इश्क कमीना
कुणी म्हणे औरो के लिये जीना........!

कुणी म्हणे एक आविष्कार
कुणी म्हणे एक साक्षात्कार
कुणी म्हणे मनाचे दर्पण
कुणी म्हणे सर्व काही अर्पण..........!

कुणी म्हणे जीवनाचं गाणं
कुणी म्हणे लोभसवान स्वप्नं
कुणी म्हणे सुंदर भावना
कुणी म्हणे सतत वेदना...........!

कुणी म्हणे टाईम पास
कुणी म्हणे एकदम झकास
कुणी म्हणे जगण्याला अर्थ
कुणी म्हणे घालवणे वेळ व्यर्थ..........!

कुणी म्हणे प्रेम हे सर्वस्व
कुणी म्हणे कुणाचे वर्चस्व
कुणी म्हणे बेदुंध एक नशा
कुणी म्हणे आत्मभान एक आशा...........!

कुणी म्हणे स्वतःचा त्याग
कुणी म्हणे अविभाज्य भाग
कुणी म्हणे फक्त भूक
कुणी म्हणे प्रश्न मूक........!

कुणी म्हणे नात्याची तहान
कुणी म्हणे विचार महान
कुणी म्हणे एक बंधन
कुणी म्हणे हृदयाचे स्पंदन..........!

कुणी म्हणे कायमची मैत्री
कुणी म्हणे विरहाच्या रात्री
कुणी म्हणे अतूट विश्वास
कुणी म्हणे जीवनाचा ध्यास..........!

कुणी म्हणे इश्वराची भक्ती
कुणी म्हणे स्वतःपासून मुक्ती
कुणी म्हणे स्वतःचा स्वार्थ
कुणी म्हणे केलेला परमार्थ...........!

कुणी म्हणे सुखाचा शोध
कुणी म्हणे मिळणारा बोध
कुणी म्हणे एक अनुभूती
कुणी म्हणे आत्मीक शक्ती..........!

कुणी म्हणे मिळालेली क्षमा
कुणी म्हणे व्यक्ती बद्द्ल तमा
कुणी म्हणे मनाची कामना
कुणी म्हणे होणारी प्रेरणा...........!

कुणी म्हणे अंतरीची आग
कुणी म्हणे येणारी जाग
कुणी म्हणे निनाद सप्तसूर
कुणी म्हणे यापासून दूर...........!

कुणी म्हणे क्षणिक सुखः
कुणी म्हणे मिळणारे दुखः
कुणी म्हणे स्वतःची प्रगती
कुणी म्हणे विचारांची क्राती...........!

कुणी म्हणे मिळणारे ज्ञान
कुणी म्हणे लागणारे ध्यान
कुणी म्हणे मनातील उधान
कुणी म्हणे मिळणारे समाधान........!

येवढे वेगवेगळे विचार
वेगवेगळे अनुभवलेले क्षण
प्रत्येकाचा निराळा अनुभव
प्रत्येकाचा वैचारीक दृष्टीकोन

नाही होत समाधान
घोडं तिथेचं अडतं
कृपया नेमक्या शब्दात सांगा
प्रेम हे नक्की काय असतं.........?????

मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय ?
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिला पाहण्यासाठी दिवसभर तळमळायचे
ती जवळ आली कि दूरवर पळायचे
पळकुटेपणाला या काय प्रेमाचे म्हणतात पाय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिने काही दिले तर(?) सर्व काही बरे असते
नाही दिले तर मात्र त्या प्रेमाचे काही खरे नसते ?
प्रेमभांगाशिवाय मग त्यांच्या समोर नसतो पर्याय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

मिलानाशिवाय यांना दुसर काही दिसत नाही
प्रेमामध्ये यांच्या यांच्याशिवाय कोणी भिजत नाही
दोन मन जुळण्यासाठी मग सर्व जग विसरण्याचा पर्याय?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेमाला विरोध नाही माझा , नाही त्या भावनेला विरोध आहे
पण सर्व राहावे सुखी यासाठीच तर नेहमी त्या प्रेमाचा शोध आहे
पण आजकाल भरकटली प्रेमवाट आणि भरकटले पाय ?......
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेम म्हणजे कसे कृष्ण राधेसारखे असावं
त्याच्यामध्ये नेहमी त्याग आणि बलिदान दिसावं
आताच्या प्रेमामध्ये या दोघांची जणूकाही गरजच नाय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

ज्याला समजला अर्थ तो नेहमी सुखात जगेल
देवाजवळ नेहमी दुसरयाच सुख मागेल
ज्याला कळला अर्थ त्याचे आपोआप टळतील सर्व अपाय

याच्या पेक्षा प्रेमाचा दुसरा अर्थ तरी काय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तू येताना मी कायम खूपच आतुर

किरणांनी पहाटे मोती उधळले
पाणी भरल्या त्या ढगांवारती.
तीच ओंजळ बघ रिती केली
पावसाने सख्या आपल्यावरती !!!



ढगांच्या पाठशिवणीच्या खेळात सखे आज
माझ्या जीवाची ही अनामिक घालमेल,
तू नाहीस सोबतीला वळीवाच्या मोसमात
कोरडाचं मी असून अल्लड सरींची रेलचेल..!!



पाउस वेडा दाटून आला
ती निघून जाता
घेऊन गेली मेघ सोबत
डोळ्यातून बरसून जाता




तुझ्या आठवणींचे ओझी
पेलवत नाहीत आता
आयुष्याच्या कॅनव्हासवर
रंगं चिकटत नाहीत आता...



तू येताना मी कायम
खूपच आतुर
आज तू नाही तेव्हा
पाउसही फितूर...



बरसताना आभाळ
मी उघडा राहतो
देह भिजतो माझा अन्
मी आतून कोरडा होत जातो



प्राक्तन माझं किंवा योगायोग म्हण आविष्काराचा
तुझ्याशिवाय मनाचं माझ्या झालं नाही कुठेचं एकमत,
आलीस आणि सर्वार्थाने समरस झालीस माझ्यात
चांगुलपणा तुझा की सौंदर्याच्या देणगीची नजाकत..!!

जर कोणी साथ सोडली

जर कोणी साथ सोडली
तर एकटे वाटायला लागते,
गर्दीत असून सुद्धा
एकटेपण जाणवायला लागते..
अचानक कोणी लांब जाता
आपण काय करावे?
दिशा धुरकट झाल्यावर.....
पाउल कुठे टाकावे...?
आठवू लागतात ते क्षण
रात्र उराशी चढल्यावर,
उश्याही अपुऱ्या पडतात
डोळे खच्चून भरल्यावर...
प्रवासाचे भान नसते
साथ कोणाची सुटल्यावर,
मग फरक नाही पडत
कितीही गाड्या चुकल्यावर...

ती रुसून जेव्हा दूर गेली, वाटलं सारं काही संपलं..

कॅसानोवा बनलो होतो मी...
प्रेम असं काही नसतच असं स्वतःलाच समजावत होतो मी...

पण कुठून कोण जाणे, कुठल्या निमित्ते,
नकळत तिने मी स्वतःला घालून घेतलेल्या बेड्यांचे पाश तोडले...
कोरडे पडलेल्या माझ्या हृदयास तिच्या येण्याने भिजते केले...

प्रेम अशी कुठलीच भावना जगात नसते असे ओरडून सांगणारा मी..
तिच्या सहवासात आकंठ बुडवून घेतले स्वतःला..
अजाणतेपणी का होईना तिचे आकर्षण स्वस्थ बसू देईना..

हळूहळू प्रेम ह्या संकल्पनेला अनुभवू लागलो,
कितीही सुंदर मुली दिसल्या तरी तिचे सौंदर्य ते अप्रतिम,
कशीही असली तरी ती माझी होऊ दे तो मोह अन मी तिचा गालिब..

ती रुसून जेव्हा दूर गेली, वाटलं सारं काही संपलं..
तिच्या प्रत्येक प्रतिक्रियेचे हजार अर्थ शोधिता..
स्वतःलाच घडवत होतो मी..

ती तशीच राहावी हा नाहक हट्ट माझा..
तिला मी आवडावे हि वेडी माझी आशा..
प्रेम ते काय हेच असतं उमगत होतं आत्ता..

कॅसानोवा बनलो होतो मी...
प्रेम असं काही नसतच असं स्वतःलाच समजावत होतो मी...
-तिच्या प्रेमात घायाळ असा एक कॅसानोवा-

ये साली जिंदगी अजीब होती है

केहते है जिंदगी खुबसुरत है
दर्द भी जिंदगी के खूब है
जजबात राखे है चाहत के
और चाहत भी दर्द काही एक रूप है!
वोह नाही चाहते हमे तो
कोई शिकवा नही
हम तो ठेहेरे पल दो पल के साथी
बस जिंदगी के एहसान तले मजबूर है........!



दर्द ही राहो में अब
खुशिया हमारी नाही
भूलकर आप छोड गये ये दुनिया हमसे पहले
तो बस एक आवाज देना
वैसेभी ये जिंदगी अब हमे प्यारी नही...




ये साली जिंदगी अजीब होती है
अपने होते अहि पराये,
गैरोसे यहा उम्मीद मिलती है
और लीपटे है इनसे भी गमो के साये...

जिंदगी खुशियो से भरी
और गम के अंधेरे तौफे में मिलते है,
चाहो दिल से किसी को तो
नफरत से भी मोहोब्बत होती है...

तुझे ते गालात गोड हसने

तुझे ते गालात गोड हसने आठव्ल्याशीवाय रहावत नाही,
तुझ्या चेह्र्याशीवाय काहीच बघावास वाटत नाही,
तुझ्या नीतल प्रेमाला माझ हुदय वीसरू शकत नाही,
आणी तू समोर नसलीस की जगावासच वाटत नाही....

नाही केलेस प्रेम तरी चालेल,

नाही केलेस प्रेम तरी चालेल,
तीर्स्कार मात्रा करु नकोस,
नाही ओळख दीलीस तरी चालेल,
पण मैत्री माझी वीसरु नकोस,
नाही काढ़ालीस आठवण तरी चालेल,
पण विसरून मात्रा जाऊ नकोस....

दिवाना नका म्हणू रे मला वेडाच राहू दे

दिवाना नका म्हणू रे मला वेडाच राहू दे
वेचू नको फुलांना पडलेला तो सडाच राहू दे
छेडता तिच्या नावाने हायसे वाटते आता
कोरड्या डोळ्यात स्वप्नाचा पसारा ओलाच राहू दे

भिरभिरत्या पापण्यांना आराम दे काही

भिरभिरत्या पापण्यांना आराम दे काही
नाजूक शब्दांचेच पुन्हा तेच घाव दे काही
ह्या मैफिलीस संशयीत वाटे भेट अपुली
तुझ्या माझ्या या नात्याला नाव दे काही









ओलांडणार नाही पाणी,
डोळ्यांचे उंबरे .
फक्त पाउस पडत राहुदे..!
तू म्हणाली होतीस...............

तुलाच अर्पण हे माझे आयुष्य अवघे .....
तुझा मी.............................




सोडून सावलीला आज उंन चोरले मी
वीसरून दुखाला.. सुखाचे गाव शोधले मी
ते ठेवले मी जपून हृदयी प्रेम माझे-तुझे
आलो निघून असा...जग मागे सोडले मी

एकदा वाटलं करावी रंगरंगोटी काव्यरूपी सागराला

एकदा वाटलं करावी रंगरंगोटी काव्यरूपी सागराला
पण कुंचला अपुरा पडला पोहोचण्या त्या तीराला,
लाख मोलाचे शब्द उजळवण्याचा आवाक्याबाहेरचा यत्न
नाहीचं साध्य झालं अखेरपर्यंत ह्या वेड्या पीराला..!!








पाहून तुला चंद्र म्हणे चांदणीला
भू-वरी हा मोती कुणी माळला

तू पापण्यांचा भार हळूच उचलता
पाहून रूप तुझे चन्द्र तो ओशाळला







घेणे आणि तडजोड करणे ह्या दोन्ही ही गोष्टी आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत....

जुळवून घ्या.. जेव्हा कोणाला तरी तुमच्या बरोबर रहावस वाटत, आणि

तडजोड करा.. जेव्हा तुम्हाला कोणाबरोबर तरी रहावस वाटत.

वाचनीय..!!

काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात..

काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात..
ओळखीच्या वाटेऐवजी अनोळखी वाटा धरायच्या नसतात...

आवडतात अनेक व्यक्ती या आयुष्याच्या प्रवासात....
प्रत्येकानाच हृदयाच्या कोपऱ्यात वसावायच्या नसतात...!

काल रात्रभर तळमळलो तुझ्या आठवणींत

म्हणे सखी लिही शब्दात प्रेमाला
मी क्षणात पुढे तिच्या ठेवले मनाला

भांबावली थोडी म्हणे वाचू कशी मी ?
जीव तो अजाण विचारे ह्या जीवाला

स्तब्ध होवुनी गाळले तिने आसवाला
जे न कळले कुणा,कळले त्या डोळ्याला


दबक्या चालीने आजकाल विचारही वावरतात
उगाचं दचकतं अदृश्य तुझ्या सावलीला बावर मन,
साम-दाम-दंड-भेद हताश कनवटीला बसतात
अंकुश सुटतो जेव्हा जागतं तळवटातील स्वप्न..!!




आकाश भरून चांदणे वाटून दिले तुला
मी ओंजळीभर "शब्द"घेवून चालतो आहे
तुला चंद्र म्हणून दिवाने ओळखतात सारे
मी अंधार सारून इथला तुला लिहितो आहे




काल रात्रभर तळमळलो तुझ्या आठवणींत
सुजलेले डोळे देत होते खुल्या डोळ्यांनी साक्ष,
कशी जाणीव करून द्यावी हालत मजनूची
मात्र तुज सामोरी पाहता ओठ घेती तुझाचं पक्ष..!!

मन माझे काही करावयास धजेना,

मन माझे काही करावयास धजेना,
आशा आहेत अनेक, सुरूवात सापडेना...
अनेक वेळा सांगतो माझ्या वेडया मनाला,
प्रेमाविना नसे अर्थ ह्या जीवनाला...
मन मोहून टाकतो सांजचा हा वारा,
मनास उमाळा येतो शोधितो मी निवारा...
प्रेमांकुशामध्ये होते कोंडी मनाची,
यातना करूनही सापडेना पाउलवाट जीवनाची...
आज मन घाबरते सांगू व्यथा कुणाला?
आहे माझ्या मनाची ठाऊक कथा कुणाला?
अखेर जय मिळालाच माझ्या वेड्या मनाला,
प्रेमाविना नसे अर्थ ह्या जीवनाला...

कुणाला कळून न कळलेली..

प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभरलपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. .
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना...
जग बदलणारी...
जग चालवणारी..

Monday, September 12, 2011

चालणारे दोन पाय , किती विसंगत .

चालणारे दोन पाय , किती विसंगत .
एक मागे असतो, एक पुढे असतो.
पुढच्याला अभिमान नसतो ,
मागच्याला अपमान नसतो.
कारण त्याला ठाऊक असत ,
शणात हे बदलणार असत.
याच नाव जीवन असत....

मनी भेटीची ओढ होती सख्या सोबत ,पावसाची सर होती .

मी सांगणार आहे माझ्या मनाला

तू चोरून येतोस ,मला भेटायला .

बघितलच कुणी सख्या तुला ,तर

जातोस पापण्यांच्या आड लपायला




मनी भेटीची ओढ होती
सख्या सोबत ,पावसाची सर होती .
दोघांनी पाहिलेली स्वप्नेसुद्धा
दोन पावले आपल्या पुढेच होती.

वाटेतली फुलेसुद्धा सख्या
तुडवत काट्यांना येत होती.
नकळत का होईना पण
मध्येच डोकावून पाहत होती.

रात्रीनंतर पहाट आणि पुन्हा रात्र
रोजच सख्या होत होती.
पण येता जाता दुपारही
रोज चांदण उधळत होती !!!

अशाच सख्या गंधित अंगणी
प्रीती आपली फुलत होती .
वरून किरणे रात्रीही
ओंजळीतून मोती उधळत होती !!!!!!!!!!