गावातल्या दगडी देवळाच्या पायरीवर
शांत पणे बसावे
दिवस भर उन्हाने तापलेल्या
दगडांची उब घेत बसावे...
कोणी पाणी शिंपडताच एक सुहास दरवळतो
उदबत्तीचा सुघंदं मोहक वाटतो,
अन् विझलेला दिवा कुणीतरी पेटवते
व मनात शांतीचे वारे भूरभुरते...
हळू हळू संधिप्रकाश रेंगाळतो
अंधारात विलीन होऊ लागतो...
दिव्याचा प्रकाश मूर्तीवर पडतो
गोजिरवाणी मूर्ती हसते
अन् एकरूप होऊ लागतो
आपला आत्मा त्या हसण्यात...
बस हेच ते जे हवे हवे से असते
जिथे काही हि बोलायचे नसते
अस्तित्व आपले विसरायचे असते
अन् फक्त शांततेत विलीन व्हायचे असते....
No comments:
Post a Comment