Friday, September 23, 2011

तुला चोरुन पाहताना...

रात्र भर आता डोळे..
तुझ्या प्रतिक्षेत जागतात..
तु दिसलीस कि ते...
वेड्या सारखं वागतात..



तुला चोरुन पाहताना...
तु एकदा पाहिल होत...
मनात खंत एकच राहीली तेव्हा,
तुझ्याशी नजरा नजर करणं राहील होतं...



माझ्या सोबत खेळताना..
तु लहान होऊन जायचीस...
अशी कशी ग "आई" तू...
माझ्या मनातले जाणून घ्यायचीस..




चुक माझीच होती..
मी तुला फ़क्त दुरुनच पाहिलं...
अन तुझ्या जवळ येऊन...
दोन शब्द प्रेमाचे बोलायचं राहीलं..

No comments:

Post a Comment