प्रेमाचे श्राद्ध सखे
भरले आठवणींने ते स्मशान
पत्ता स्मशानाचा सखे
नेहमीचे आपले ते ठिकाण...
कधी कुणावर आपण
किती ठेवावा विश्वास...
कुणी मागे पर्यंत.....
निघून जाईल हा श्वास
तू वेडा आहेस
असे तिचे डोळे म्हणाले होते मज शहाण्यास काय ठाऊक
तिने भविष्य सांगितले होते..
तुझ्या त्या शब्दाने
मन माझ हेलावल
त्या अंतरीच्या जखमेन
भरून न यायचं ठरवलं
एका ओळीत तुझ्यासाठी काय काय लिहू......
तुझे रूप मांडू कि तुझे अंतर मन...
शब्दांनाही त्यांची एक आहे सीमा..
त्यात सामावणार नाही असे आहेत ग तुझे गुण..
No comments:
Post a Comment