"काळा ढग""
आकाशात काळे पांढरे ढग रंगवून पट खेळतोयस तू
सूर्याला लपवून पाठीशी
माझ्या अंगणात काळोख पसरवून
आनंदी झाला असंशील तू,
कि उजेडाला मात दिली मी
वेडा आहेस.............
मी काजवे घेवून चालतोय ह्या अंधारात
आणि मार्ग सुद्धा मिळालाय मला..
तू विजांचा धाक दाखवून
मुसळधार बरसलास माझ्यावर
बघ ...मी इवल्याश्या ओंजळीत
झेललंय तुला .......
तू तुटून पडलास कधी माझ्यावर
कधी वादळे पाठवली उजाडण्या मला
पण मी मात्र वैर कधी केले नाही तुझ्याशी
पडलेले घर बांधत राहलो पुन्हा पुन्हा
तुझ्या सरींच्या त्या लाटांनी
उध्वस्त करू पहाले तू बांध माझ्या मनाचे
आणि माझ्या एका आसवाने ढळता ढळता
तुझा चंद्रच विरघळून टाकला
आनंदी होत असशील जेव्हा
या तुझ्या पटाच्या खेळात "जीवन" हरत असेल तेव्हा
पण ध्यानात असु दे तुझ्या
हे शरीर वाहून नेत आहेस तू
माझा आत्मा अजूनही खंबीर आहे तिथेच
तुझ्याशी याच पटावर ..............खेळण्यासाठी
बघ फिरवून एकदा त्या पटाला
विजय माझाच असेन......................
No comments:
Post a Comment