Thursday, September 22, 2011

हात कुणाकडे पसरविता, स्वाभिमानानी तरी कसे जगायचे ?

आधार आभाळाचा कधी हरविता
पक्षांनी तरी कुठे बागडायचे,
साथ चांदण्यांनी कधी सोडता
आभाळानि तरी कस रडायचे

अथांगता सागराची कधी हरविता
मास्यांनि तरी कुठे लपायचे,
साथ पाण्यानी कधी सोडता
सागरानी तरी कसे सावरायचे

पौर्णिमेच्या रात्री चंद्रानीच
आभाळ नटायचे,
अमावस्येच्या काळोखाला तरी
त्यानी कसे झाकायचे

नकळत आज वाऱ्यानेही
कधी वाहने थांबायचे,
हतबल होऊन बघण्याशिवाय
सृष्टीनेतरी काय करायचे

श्वासालाही मोहताज या जीवाला
सांभाळता नाकी-नऊ यायचे,
अश्रुचे थेंब लपविता
कधी त्यांचे बांधही फुटायचे

कोऱ्या कागदावर लेखणीतून
कितीतरी स्वप्नं उतरायचे,
लेखणीने कधी साथ सोडता
स्वप्नही तिथेच मिटायचे

हात कुणाकडे पसरविता
स्वाभिमानानी तरी कसे जगायचे ?
शेवटी पोटाच्या आगीत
स्वाभिमानही " भस्म " व्हायचे

No comments:

Post a Comment