Monday, September 19, 2011

शपथ माझ्या रक्ताची तुला येऊ नकोस माघारी

!माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते

कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!



शपथ माझ्या रक्ताची तुला येऊ नकोस माघारी
नाही दिसणार तुला मी आता कधीचं ह्या संसारी,
पुसट आशा तुझ्या परतण्याच्या आता संपल्या
अस्तित्वाची ज्योत आता माझीही न टिकणारी..!!



सुटता सुटेना हे बंध
आडकून ठेवी हा गंध
जेह्वा हि येई हि आठवण
क्षणातच वाढी हि स्पंदन

No comments:

Post a Comment