मी तर आहे मदमस्त वारा,
झुळूक तुही होशील का...?
करूया स्पर्धा नभांशीच या,
माझ्यासवे येशील का...?
बनुनी ऋतू सुखवू जनांना,
गंध प्रितीचा देशील का...?
बहरून टाकू समस्त बागा,
हात हाती तू घेशील का...?
नेसून साजरा लाल जोडा,
हिरवा शालू लेशील का...?
गाऊनी गाणे धुंद मनाचे,
स्वर आकाशी नेशील का...?
मी तर आहे मदमस्त वारा,
झुळूक तुही होशील का...?
No comments:
Post a Comment