दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी
तुझी भेट व्हावी तरी न थेट व्हावी
दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी
बागेत उभा मी तू पुन्हा थोडी लेट यावी
मग पापणी तुझी उगाच वेट व्हावी
कारणे अशीही दाखविता तू मंजुळा
तापलेली जिव्हा माझी चेक मेट व्हावी
गुलाब दमलेला मग तुझ्या पुढ्यात ठेवावा
वाया गेलेली वेळ ती पुन्हा सेट व्हावी
हळुवार स्पंदने ती बोईंग किवा जेट व्हावी
तुझी भेट व्हावी अशी तुझ्या माझ्यात ग्रेट व्हावी
No comments:
Post a Comment