"हरविलेले काव्य शब्द
अचानक कधीतरी सापडतात,
अपलेच शब्द वेचताना
नकळत पापण्या भिजवतात.. "
तुला कळते ना ग माझी सवय..
मग तरी तू उगाच रुसतेस..
मी तुला मानावावे म्हणून...
उगाच हट्ट करून बसतेस..
ओळख नसते पाळख नसते असे अपणास कोणीतरी भेटते,
मग एकमेकांची ओळख पटते,
त्याची आपली गट्टी जमते,
एकमेकांच्या मनातील भाषा कळते,
इकडे तिकडे मन वळते,
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे अवघड असते,
दूर राहणे असह्य होते, का असे हे नाते असते,
अशीच ही न तुटणारी जन्मोजन्मीची मैञी असते
No comments:
Post a Comment