Tuesday, September 13, 2011

आज परत एकदा, मी.. खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...

आज परत एकदा, मी..
खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...
हरवलो होतो भूतकाळात.
सगळ कसं डोळ्यांसमोरून चाललं होतं..
जणू काही आत्ताच घडतंय !!
जाणवले तुझे स्पर्श,
डबडबलेली नजर तुझी आठवली
अन् टचकन माझ्याच डोळ्यातून थेंब ओघळला...
टिपला मी तो, वेचलेल्या क्षणांसारखा...
कोरडे हसू येते मला, कि किती दिवस झाले कोण जाणे.... मान खाली घालून जगण्याला..!!
रात्र झाली ना कि वेड्यासारखे होते बघ
गलबलते, चढणाऱ्या रात्री बरोबर...
चांगले क्षण आठवतात,
जे आता गळून पडले आहेत सुकलेल्या पानांसारखे..
सगळं थांबलं आहे आज...,
जेव्हा तुझ्या आठवणी सुटल्या, माझ्या कुठल्यातरी मनातल्या खोल वाटेवरून.
जी वाट हरवली होती, काळाच्या जंगलात..
मुरली होती पावसाच्या पाण्यासारखी...
जिथे दोन्ही बाजूंना तुझी गर्द राई होती..
आणि तुझ्या प्रेमाच्या हिरवळीचा गारवा..
जो आत्ताच्या बोचणाऱ्या एकाकी गरव्या सारखा नव्हता कधीच... नुसता कोरडा हा गारवा ग..!!
आज परत एकदा
तू दाटून आलीस ढगांसारखी
बरसुनी डोळ्यांतून.... बेधुंद होऊन..
सगळं सरलं, नुसत्या जखमा उरल्या मागे..
फुंकर घालण्यासाठी....
आज परत एकदा..
परत एकदा......!!!

No comments:

Post a Comment