
Monday, September 19, 2011
कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,पण
कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,ती आपली खास मैत्रीणअसते.जी आपल्याला रोज SMS करते,आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,ती आपली खास मैत्रीणअसते.जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,ती आपली खास अशीमैत्रीण असते.तिची पण अवस्था काही निराळी नसते,कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,ती आपली खास अशी मैत्रीण असते.ती कधी कॉलेजला नाही आलीतर,जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,ती आपली खास मैत्रीण असते.कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपलीबाजू घेऊन बोलते ना,ती आपली खास मैत्रीण असते,जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,छान होती...अशी एक दाद देते ना,ती आपली खास अशी मैत्रीण असते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment