शब्दात तुझे रूप मांडता येत नाही ,
कारण त्याला शब्दच अपुरे पडतात,
तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
अजूनही माझ्या ओठीच अडतात....
विचारांचे खेळच एक शतरंज आहे
कधी जय कधी मात
मनात एक द्वंद आहे...
तुझ्या त्या वेड्या प्रेमाच्या सये
अजून खुणा नाही मिटल्या
जेवढा केला पुसायचा प्रयत्न मी
तेवढ्याच त्या ठळक उमटल्या
तस्वीर तुझी अजूनही..
डोळ्यात भरुन येते..
दुर असलीर तरी...
हृदयात घर करुन जातेस..
मृत्यू आला की फक्त...
शरीर सोबत घेऊन जातो...
आत्मा मात्र प्रेमासाठी..
सतत भटकत राहतो..
माझा तुझ्या सोबतचा..
प्रत्येक क्षण वेगळा आहे..
तु दुर असलीस तरी..
मनात पसारा सगळा आहे
No comments:
Post a Comment