होतास तू पावसा बरोबर , म्हणून मी धाडस केल.
धरतीच्या अंगावर कलाकुसर, करण्याच साहस केल.
कुंचला घेऊन बघ पिकाला,मी मालिश केल.
कस त्यातून बघ ,टपोर मोती निपजल.
आभाळाला एकदा निवडायला घेतलं सखीने
पाखडून निघालेल्या चांदण्या फेकल्या तिने खाली,
थोड्या ताराकांसोबत चंद्र होता उरला सुपात
साजन वरचढ म्हणून मग चंद्रही केराच्या हवाली..!!
No comments:
Post a Comment