डोळ्यांनी का चहाडी करावी सख्या तुझ्या मनाकडे? ,
मग त्यानेही मला बोलवावं ,
अस केंव्हाही तुझ्याकडे ?
पाऊल तुझं भिडलं आपसूक सखे
मनाच्या उंबरठ्यावर अडखळलं,
धीर देता प्रेमाचा ते आपणहून
अंतरंगापर्यंत बघ कसं हळहळलं..!!
तू मला भेटायला बोलावलंस ,
आणि मी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं,
पण कस काय कोण जाणे,
पण ते तुझ्या मनाच्या दारात पडलं !
चहाडी प्रीतीची सखे
अंगाअंगातून दर्शते,
भरली नजर तुझी
आता मनोमनी स्पर्शते..!!
No comments:
Post a Comment