Friday, September 23, 2011

माझीच हार आता माझ्या शब्दात आहे

हे सूर कोणते हो, हे कोण गात आहे
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे

नाही कधीच केली चिंता पराभवाची
माझीच हार आता माझ्या शब्दात आहे

बंधास तोडले मी , प्रेमास त्यागले मी
माझाच मी असा माझ्या मनात आहे

व्यर्थ सर्व पिडा , खोटे तुझे बहाणे
कोणास बोल लावू ,सारे उरात आहे

भेटीस टाळल्याचा आनंद आज आहे
निरोप आज घेतो मी हा सुखात आहे

No comments:

Post a Comment