गडबडलं धडधडलं हृदय हे माझं
न कळली ताकत त्या दर्शनाची,
तगमग लगबग झाली मनाची
शीतोष्ण लाहीलाही सर्वांगाची..!!
मजला कसला हक्क करण्याचा
तारीफ तुझ्या मोहक रूपाचा
शब्दच वेडे माझे सख्ये
तोडिसी बांध मनी भावनाचा
जाताना काल ती जराशी अडखळली
मागे वळून हळूचं गालात हसली,
वेडाबाईचा माझ्या गोंधळ किती होतो
परत गुपचूप शेजारी येऊन बसली..!!
चारोळ्या माझ्या पण त्यांत छबी तुझीचं
काव्याचा सागर, शब्दांचा आहेर तुला अर्पण,
धन्यता आयुष्याला त्या चार ओळींच्या
स्वखुशीने तुझ्या सौंदर्याला त्याचं समर्पण..!!
No comments:
Post a Comment