Thursday, September 22, 2011

सकाळची वेळ होती

सकाळची वेळ होती
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
बाहेर डोकावत होतो ...

अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
जणू माझ्या कवेत ...

तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
तिची ती नजर पहिली ...

साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
तिच्यावरच खिळली ...

आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
अलवार बाजूला सारत ...

ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
माझ्या जवळ आली ...

जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
उठ लवकर, बसू दे मला ...

काय राव काय सांगू कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..

म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
मनात भरल्याशिवाय राहणार नाही

हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...


आमोल घायाळ

No comments:

Post a Comment