Monday, September 19, 2011

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...
तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही..
पण प्रत्येकवेळी कुठले कारण शोधू?
अन तिने फोन उचलल्यावर माझे ततपप कसे थांबवू?
बोलायचे असते एक, अन निघते ओठांतून भलतेच..
ती स्वतःतच मग्न, पण कळतं तिलाही सगळं..
तिला राग येईल असे वागून फायदा नाही,
अन इथे माझ्या अस्वस्थतेला तिच्याशिवाय उपाय नाही!
बहाणे तयार करून ठेवतोय, देव पाण्यात घालून बसलोय,
ती प्रसन्न व्हावी ह्याकरिता आराधना करतोय..
दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस, तिचेच स्मरण अन तिचेच चिंतन..
एकदा हो म्हणाली कि चिंता मिटली,
पण ती वेळ लवकर यावी इतकीच माझी घाई!

No comments:

Post a Comment