मागणे न काही ................
भरल्या झोळ्या सुखाच्या मागणे न काही
बाकी शून्यातल्या दुखाला, मोजणे न काही
शब्द निर्मळ होऊनी वाहतो पाना पानातुनी
तू वाचले ते कधीतरी, आता बोलणे न काही
डोळ्यांनी टिपला शब्द,ओठात विसावला काही
स्तब्ध गोठला पहा तिथे, पुढे चालणे न काही
हसणे-रडणे मनाचे झाले लेखणीत कैद काही
अश्रुस दिली दाद त्यांनी, खोटे सांगणे न काही
धाग्यात ओळीच्या मी शब्दास माळले काही
मुक्त विचारात रमलो,मज आज सुचणे न काही
तो कालचा म्हणोनी जुने नाव मिळाले काही
नव्याचा ठाव कळेना,वाटा माझ्यात शोधणे न काही
का मांडले जीवना तुला निर्जीव कागदावर काही
शाईस झीज नशिबी,अमर ते जगणे न काही
प्रस्तावना जीवाची मी शेवटास मांडली काही
अंती मूल्य हे मिळाले कि लेखणीस धार नाही
शिक्षेस पात्र ठरला लिहिता चुकला कधी कुठे काही
मज निशब्द केले त्यांनी आता भोगणे न काही
सरळ चालता ओळीत त्या, तू कधी शोभला न काही
तुज वाटे सारे सारखे, ऐकले त्यांचे सांगणे न काही
No comments:
Post a Comment