सखे
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधरातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...
शोध घेण्यास माणसाचा
जितका बाहेर पडत जातो
फिरून मी येतो तिथेच
स्वतःत खोल शिरत जातो...
तुझी माझी वेळ कधी
एक होऊ शकत नाही
ओढून ताणून समन्वय
नेक होऊ शकत नाही...
No comments:
Post a Comment