मनामनात उसळू दे आपल्या ,क्रांतीची ही लाट
घालून हातात हात ,करूया दुर्गुणावर मात
मीठ खाऊनि मायभूचे
का विकती हे ईमान?
कितीही खाल्लं-पिलं तरी
नाही भागत यांची तहान .
एक असता आपण सारे ,का साहू सारे हे मुकाट?
घालून हातात हात...........................................
परकीयांना हाकून दिली
आपण यांच्या हाती कमान .
पण विसरून सारे,होऊन राहिले
हे पैशाचे रे गुलाम .
एकदिलाने दाखवू आपण, यांना आपला स्वाभिमान .
घालून हातात हात ..............................................
अंदाज नाही यांना आपला
काय करतो राष्ट्राभिमान ?
चिरडून टाकू गुर्मी यांची
घेऊन तळहाती प्राण.
एक आहोत,एक होऊनी ,राखू देशाची हो शान ....
घालून हातात हात, करू दुर्गुणावर मात....
No comments:
Post a Comment