Friday, September 23, 2011

तूझ्या नजरेला कधी ती प्रित नाही कळली,

रेल्वेच्या डब्याला...
शत शत चाके..
माहीत आहे तुला..
पण तुझं चालत नाही डोके..



जपशील का गं तू,
आपलं नातं जिवापाड ...
कि कोंडुन ठेवशील त्याला..
कोनाड्यात एका पडद्या आड..



भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही.म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.



इथल्या प्रत्येक वाशाला आता कोंब फुटायला हवेत
पक्षी कोणत्याही फांदीवर आता निर्धास्त राहायला हवेत,
तुला काय हवे हे तू ठरवायचे आहे.
माणूस म्हणून मरायचे कि मानव म्हणून जगायचे आहे.




नजरेत तूझ्या प्रेमाचे
हजार रंग भरलेले,
त्यातल्या काही रंगाने
आयुष्य माझे सजलेले,


हातावरच्या रेषा माणसाचं भविष्य सांगत असतील
,तर कारखान्यात काम करताना ज्याचे दोन्ही हात
मशीनमध्ये कापले गेलेत त्यांना काही
भविष्यच नसतं असं कुठे आहे?


तूझ्या नजरेमध्ये वेडी
प्रीत माझी बहरली,
तूझ्या नजरेला कधी
ती प्रित नाही कळली,

No comments:

Post a Comment