ती रात्र, शांत, एकाकी, निर्मनुष्य,
कानात भुरभुरणारा वारा आणि रातकिड्यांची किरकिर
उधाण आलेले आठवणींना अन् नजर शून्य...
दुःख नाही...
फक्त शांतता,
संवेदना थोड्या बोथट झालेल्या
आणि जाणिवांची पोकाळता...
बाहेर पडल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर
पाऊले दिशाहीन वळतात,
अंधारातील घरट्यांचे
दरवाजेही बंद असतात...
प्रत्येक जागेच्या आठवणीत
हळू हळू विरघळतो मी अंधारात,
मागे वळून पाहताच
उमटलेल्या पाऊलांचे फक्त ठसे दिसतात....
रस्ता संपतो
अन् रात्र झोपी जाते,
क्षितिजावर उगवलेली पहाट
नवीच कहाणी सांगत असते....
कानात भुरभुरणारा वारा आणि रातकिड्यांची किरकिर
उधाण आलेले आठवणींना अन् नजर शून्य...
दुःख नाही...
फक्त शांतता,
संवेदना थोड्या बोथट झालेल्या
आणि जाणिवांची पोकाळता...
बाहेर पडल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर
पाऊले दिशाहीन वळतात,
अंधारातील घरट्यांचे
दरवाजेही बंद असतात...
प्रत्येक जागेच्या आठवणीत
हळू हळू विरघळतो मी अंधारात,
मागे वळून पाहताच
उमटलेल्या पाऊलांचे फक्त ठसे दिसतात....
रस्ता संपतो
अन् रात्र झोपी जाते,
क्षितिजावर उगवलेली पहाट
नवीच कहाणी सांगत असते....
No comments:
Post a Comment